मेहबूबा मुफ्ती अस्तनीतली साप, ‘या’ केंद्रीय मंत्र्यांची टीका

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू-काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात गुरुवारी दहशतवादी हल्ल्यात भारताचे ४० जवान शहीद झाले. पुलवामा दहशतवादी हल्यानंतर शाहिदांच्या श्रद्धांजली बरोबरच राजकीय आरोप प्रत्यारोपांचे सत्र देखील सुरु आहे. पाकिस्तानसोबत शांतता चर्चा करण्याच्या मागणीवरून केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह यांनी जम्मू कश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांना अस्तनीतल्या साप म्हणत टीका केली आहे.

मेहबूबा मुफ्ती यांनी पाकिस्तानसोबत शांतता चर्चेची मागणी केली आहे. यावरून मुफ्ती यांच्यावर गिरीराज सिंह यांनी सणसणीत टीका केली. सिंग म्हणाले की ‘मी फक्त मेहबूबा मुफ्ती यांना एवढेच सांगू इच्छितो की त्यांनी त्यांचे पाकिस्तान प्रेम सोडून द्यावे. हिंदुस्थानसाठी अस्तनीतला साप बनू नका’.

काय म्हणाल्या होत्या मेहबूबा मुफ्ती
मेहबुबा मुफ्ती म्हणाल्या की, ‘पठाणकोट हल्ल्यानंतर इम्रान खान यांनी गुन्हेगारांना शिक्षा द्यायला हवी होती. पण, तसे केले नाही. तरी सुद्धा त्यांना एक संधी द्यायला हवी. ते आताच सत्तेवर आले आहेत. इमरान खान हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान आहेत. आपण आता त्यांना पुरावे देऊ व बघू ते काय करतात पाकिस्तानसोबत चर्चा झाली पाहिजे’.