हिरव्या फळ्यावर पांढरी ‘रेघ’ ! मुक्ता टिळकांना 50,000 चं ‘मताधिक्य’, खा.गिरीश बापटांचे ‘भाकीत’

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विधानसभेचे एक्झिट पोल बाहेर येत आहे, त्यातून भाजपला बहुमताचा कौल असल्याचे दिसत आहे. त्यामुळे निकालाआधीच खासदार गिरीश बापट यांनी कसबा मतदारसंघातून मुक्ता टिळक विजयी होतील असे भाकीत वर्तवले आहे. लोकसभेला खासदारकी मिळाल्यावर त्या जागी कसबा पेठेतून पुणे महानगरपालिकेच्या महापौर मुक्ता टिळक यांना विधानसभेच्या निवडणूकीची संधी मिळाली. तसेच कसब्यावर भाजपचा प्रभाव मानला जातो. मागच्या विधानसभेला भाजपाला पुण्यात चांगले यश मिळाले होते. यंदा देखील भाजपने पुुण्यातील सर्व जागा लढवल्या आहेत आणि त्या जिंकून आणू असा भाजपचा विश्वास आहे.

यावर बोलताना खासदार गिरीश बापट म्हणाले की, मतदानाच्या दिवशी घेतलेल्या आढाव्यानंतर मी दरवेळी मताधिक्याचा अंदाज लिहून ठेवतो. रात्री कसबा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार मुक्ता टिळक यांच्या मताधिक्याचा आकड्यासह अंदाज लिहून ठेवला. लोकसभा निवडणुकीत स्वत:ला किती मते मिळणार याचा माझा अंदाज तंतोतंत खरा ठरला होता. यावेळी गिरीश बापट यांनी फळ्यावर मुक्ता टिळक यांना 50 हजार मताधिक्य मिळणार असे भाकीत लिहून ठेवले आहे.

भाजपने यंदा कोथरुड मतदारसंघात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना उमेदवारी दिली होती. बाहेरुन उमेदवार आणल्याने विरोधी पक्षाकडून आणि काही प्रमाणात कोथरुडकरांकडून विरोध दर्शवण्यात आला होता. त्यामुळे या मतदारसंघावर सर्वाचे लक्ष लागले आहे. चंद्रकांत पाटलांच्या विरोधात राष्ट्रवादी मनसे एकटले होते. आघाडीने मनसेच्या किशोर शिंदे यांनी पाठिंबा दिला होता. असे असले तरी चंद्रकांत पाटील 1 लाखाच्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास खासदार गिरीश बापट यांनी व्यक्त केला.

मतदान प्रक्रिया उरकून काही तासच पलटले असताना पुण्यात काही भागात खडकवासला मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे सचिन दोडके आणि पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डमधील भाजपचे उमेदवार सुनील कांबळे यांच्या कार्यकर्त्यांनी थेट आपल्या नेत्यांचे बँनर लावून, मिरवणूक काढत जोरदार आतिषबाजी केली. त्यामुळे पुण्यात निकालाआधीच विजयांची चर्चा रंगली आहे.

Visit : Policenama.com