पक्षासाठी खडसेंनी खस्ता खाल्ल्यामुळे त्यांच्याबद्दल सहानभूती : गिरीश महाजन

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – भाजपचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यातील ताणलेले संबंध राजकीय चर्चेचा नेहमीच विषय ठरतो. मात्र खडसे यांच्याबद्दल महाजन यांनी केलेले वक्तव्य हे खडसेंना भावनिक साध घालणारे आहे. एकनाथ खडसे यांच्या सोबत माझे चांगले संबंध आहेत. तसेच त्यांनी पक्षाच्या बांधणीसाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत म्हणून मला त्यांच्या बद्दल सहानभूती वाटते असे गिरीश महाजन म्हणाले आहेत. एका मराठी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात गिरीश महाजन बोलत होते.

एकनाथ खडसे यांच्याबद्दल प्रश्न विचारला असता, एकनाथ खडसे हे आमच्या पक्षातील जेष्ठ नेते आहेत. त्यांना पक्षाकडून काही अपेक्षा का असू नयेत. परंतु मला वाटत नाही कि त्यांनी बाळगलेल्या अपेक्षांमुळे त्यांना घरी बसवले आहे. पवार साहेब चार खासदार निवडून आणून मोठी अपेक्षा ठेवतात मग खडसे तर आमच्या पक्षाचे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांनी अपेक्षा का ठेवू नये असे गिरीश महाजन म्हणले आहेत.

खडसे यांच्या मंत्रिमंडळाच्या समावेशाबद्दल गिरीश महाजन यांना विचारले असता त्यांनी उत्तर दिले कि, खडसे यांना मंत्रिमंडळात समाविष्ठ करण्यासाठी विचारणा केली होती. त्यावर खडसे म्हणले कि आता दोन चार महिने मला काम करायचे नाही. त्यामुळे नव्या टर्मला त्यांना मंत्री बनवण्यात येईल असे गिरीश महाजन म्हणले आहेत.

ह्याही बातम्या वाचा –

राफेल खरेदीची उद्या होणार सुनावणी : सरकारचे सुप्रिम कोर्टात प्रतिज्ञापत्र…

कृष्णकुंजवर तयारी सुरू… लोकसभेची नाही तर…

माजी आमदार सुरेश साळोखे यांची पंधरा वर्षांनंतर घरवापसी

‘सावधान ! आता मुलंच नाही तर नातवंही पळवू’ : गिरीश महाजनांचा इशारा