‘सावधान ! आता मुलंच नाही तर नातवंही पळवू’ : गिरीश महाजनांचा इशारा

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुका काही आठवड्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशात राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडताना दिसत आहेत. नुकताच भाजपावर विरोधकांनी हल्ला चढवत, ‘मुलं पळविणारी टोळी’ असा आरोप केला होता. यालाच आता गिरीज महाजन यांनी प्रत्युत्तर देताना, आता मुलंच नाही तर नातवंही पळवू, असा इशाराच दिला आहे. भाजपाचे संकटमोचक जलसंपदा मंत्री गिरीश महाजन एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलत होते.

एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात गिरीश महाजन यांना भाजपावर होत असलेल्या ‘मुलं पळविणारी टोळी’ अशा आरोपासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, “आता मुलंच नाही तर नातवंही पळवणार आहोत. त्यांची मुलं नातवंडे ते सांभाळू शकत नाहीत का ?” असा सवाल उपस्थित करत विरोधकांनी आत्मपरिक्षण करावं असा सल्लाही त्यांनी विरोधकांना दिला. पुढे बोलताना ते म्हणाले की, “काही पक्षात आमचं घर म्हणजेच आमचा पक्ष असे समीकरण आहे. कार्यकर्त्यांनी केवळ सतरंज्या उचलायचं काम करायचं का ? असा टोलाही त्यांनी लगावला.

सुजय विखे पाटील यांच्या भाजपा प्रवेशाविषयी देखील त्यांना प्रश्न विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना गिरीश महाजन म्हणाले की, “विखे पाटील यांचा मोठा वारसा आहे. ते मोठे संस्थानिक आहेत. त्यांच्याकडील कुणी आमच्याकडे येत असतील तर त्यांचे स्वागत आहे. मात्र केवळ आमच्याकडेच अशी इनकमिंग आहे हे चूक आहे. त्यांच्याकडे धनंजय मुंडे, भास्कर जाधव, नाना पटोले हे आमचेच आहेत” असे गिरीश महाजन यावेळी म्हणाले.