Girish Mahajan | गिरीश महाजन ‘गोत्यात’? पुणे पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावात दाखल; जाणून घ्या प्रकरण

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – भाजपचे आमदार (BJP MLA) गिरीश महाजन (Girish Mahajan) संशयित असलेल्या गुन्ह्यात चौकशी (Inquiry) करण्यासाठी पुणे पोलिसांचे (Pune Police) एक पथक जळगावमध्ये दाखल झालं आहे. जळगाव मधील मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या (Maratha Vidya Prasarak Sanstha Jalgaon) वादाप्रकरणी पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात (Kothrud police station) गुन्हा (FIR) दाखल आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांचे पथक जळगवात दाखल झाल्याने गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्यावर मोक्काची कारवाई (MCOCA Action) Mokka होणार असून त्यांनी उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे, अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कोथरुड पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या गुन्ह्यात चौकशीसाठी आज (रविवार) पहाटे पासून पोलिसांचे 50 जणांचे पथक जळगावमध्ये दाखल झाले आहे.

नेमकं काय आहे प्रकरण?

जळगावमधील बहुचर्चित मराठा विद्या प्रसारक संस्थेची जागा हडप करण्यासाठी भोईट गटाला मदत करुन गिरीश महाजन आणि त्यांच्या समर्थकांनी आपल्याला डांबून ठेवत धमकावण्यासह खंडणी (Ransom) वसूल केल्याची तक्रार ॲड. विजय भास्कर पाटील (Adv. Vijay Bhaskar Patil) यांनी केली होती.
या प्रकरणी त्यांनी जळगाव जिल्ह्यातील निंभोरा पोलीस ठाण्यात (Nimbhora Police Station) गुन्हा दाखल केला होता.
त्यानंतर हा गुन्हा पुण्यातील कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

पुणे पोलिसांची पाच पथके जळगावात

कोथरुड पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यात चौकशीसाठी पुणे पोलिसांचे पथक रविवारी सकाळी जळगावमध्ये दाखल झाले.
सहाय्यक पोलिस आयुक्त सुषमा चव्हाण (ACP Sushma Chavan) यांच्या नेतृत्वाखाली पाच पथके तयार करण्यात आली आहेत.
या पथकांकडून स्वतंत्ररित्या चौकशी केली जाणार आहे.

दमदाटी करुन खंडणी घेतल्याचा आरोप

फिर्यादीत ॲड. विजय भास्कर पाटील यांनी म्हटले होते की, ते जळगाव येथील मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्था जळगावचे संचालक आहेत.
त्यांना आरोपींनी पुण्यात संस्थेचे कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने बोलावून घेतले.
ते पुण्यात आल्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करण्यास सुरुवात केली.
तसेच त्यांना गाडीत जबरदस्तीने बसवत सदाशिव पेठेत (Sadashiv Peth) असलेल्या एका फ्लॅटवर नेले.
या ठिकाणी मारहाण करत गळ्याला आणि पोटाला चाकू लावला.
फिर्यादी यांच्या सोबत असलेल्या दुसऱ्या एका व्यक्तीलाही त्यांनी याठिकाणी डांबले.
तर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या (MPDA) गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत पाच लाख रुपयांची खंडणी घेतली.

हा प्रकार जानेवारी 2018 ते जानेवारी 2021 या कालावधीत घडला होता. मात्र, त्यांनी उशिरा तक्रार केली. याप्रकरणी गिरीश महाजन, रामेश्वर नाईक (Rameshwar Naik), निलेश भोईटे (Nilesh Bhoite) यांच्यासह 29 जणांवर निंभोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर तो कोथरुड पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला.

Web Title :-  Girish Mahajan | bjp mla girish mahajan may be in trouble pune police 50 policeman and officers team arrives in jalgaon for Maratha Vidya Prasarak Sanstha Jalgaon kothrud police station case

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | पुणे महापालिकेच्या कनिष्ठ अभियंत्यास धमकावले; शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

 

Omicron Covid Symptoms |ओमिक्रॉनची सुरुवातीची लक्षणे कोण-कोणती आहेत? जाणून घ्या ती शरीरात किती दिवसात दिसतात

 

PPF Calculator | ‘या’ खास ट्रिकने पीपीएफमध्ये जमा करा पैसे ! व्हाल 1.5 कोटीचे मालक, जाणून घ्या कॅलक्युलेशन