अहमदनगर : मंत्री शिंदेच्या अर्जासाठी गिरीश महाजन कर्जतमध्ये

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – कर्जत-जामखेड मतदार संघातून भाजप विद्यमान आमदार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी भाजपकडून आज उमेदवारी अर्ज दाखल केला. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, खा. सुजय विखे, आ. मोनिका राजळे आदी उपस्थित होते.

मंत्री राम शिंदे यांनी चौंडी येथे असलेल्या त्यांच्या राहत्या घरी जाऊन आई-वडिलांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांच्या आई आणि पत्नीने राम शिंदे यांचे औक्षण देखील केले. अर्ज दाखल केल्यानंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत कर्जत येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. त्या अगोदर कर्जत शहरातून भव्य रॅली काढण्यात आली होती.

कर्जत-जामखेड परिसरातील असंख्य कार्यकर्ते या रॅलीत सहभागी झाले होते. शिंदे यांच्या विरोधात शरद पवारांचे नातू रोहित पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. मात्र विरोधकांकडे कोणतेही मुद्दे नसून धनशक्तीची ताकद असल्याचे सांगत विजय हा भाजपचाच होणार असल्याचा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला आहेे.

visit : Policenama.com