Girish Mahajan | काय सांगता ! होय, माजी मंत्री गिरीश महाजनांनी चक्क सिनेमा निर्मात्याकडे केली ‘ही’ मागणी; म्हणाले – ‘अजितदादा, जयंत पाटील….’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Girish Mahajan | जामनेर (Jamner) येथे हलगट या चित्रपटाच्या पोस्टरचे प्रमोशन आज (शनिवारी) भाजप नेते (BJP) आणि आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी चित्रपट निर्मात्याकडे (Filmmaker) एक आनोखी मागणी केली आहे. अजितदादा (Ajit Pawar), मुनगट्टीवार (Sudhir Mungantiwar), जयंत पाटील (Jayant Patil), विखे पाटील (Vikhe Patil) आणि माझी आता आमदारकीच्या 6 टर्म झाल्या आहेत. पक्षाने जर आम्हाला उमेदवारी दिली नाही तर आम्हाला सिनेमात भूमिका द्या. थेट अशी मागणी महाजन यांनी केली आहे.

 

गिरीश महाजन (Girish Mahajan) म्हणाले की, बाबुराव घोंगडे यांना एक विनंती आहे. महाराष्ट्रात आम्ही 2-4, पाच आमदार सिनिअर आहोत. जयंत पाटील, अजितदादा, सुधिर मुनगंटीवार, विखे पाटील आणि माझ्या 6 टर्म झाल्या आहेत. मी सिनिअर वाटत नाही पण आहे. 6 वी टर्म आहे माझी. पण पक्षाचं काही धोरण आहे की, एका व्यक्तीला किती वेळा तिकीट द्यायचं. त्यामुळे पुढे, मागे आमची निवृत्ती होणार. म्हणून तुमच्या सिनेमात आम्हाला एखादी जागा ठेवा. पुढे आम्ही करणार काय? असं गिरीश महाजन यांनी म्हटलं आहे.

जामनेर येथील सिनेमा निर्माते बाबुराव घोंगडे (Baburao Ghongade) यांनी हलगट या चित्रपटाची निर्मिती केली आहे.
विशेष म्हणजे या चित्रपटात सर्व जामनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील कलाकारांनी भूमिका केल्या आहेत.
हा सिनेमा लवकरच सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्यावेळी पोस्टरचे प्रमोशन करण्यात आले.
त्यावेळी गिरीश महाजन यांनी घोंगडे याच्यांकडे मागणी केली.
तेव्हा तुमच्यासाठी इंग्रजी सिनेमा काढून त्यात काम करण्याची संधी देईन.
असं बाबुराव घोंगडे गमतीने म्हणाले. त्यावर सर्वांच्या हशा पिकल्या.

 

Web Title :- Girish Mahajan | former minister girish mahajan demands role in movie to filmmaker with ajit pawar sudhir mungantiwar jayant patil vikhe patil

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Chhagan Bhujbal | ‘देवेंद्र फडणवीसांमधील ‘हा’ एक गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही’ – छगन भुजबळ

Manyata Dutt | संजय दत्तची पत्नी मान्यताचे दसर्‍याच्या दिवशीच व्हायरल झाले बोल्ड फोटो, पाहून तुम्ही देखील व्हाल हैराण

Mumbai Crime | धक्कादायक ! कुटुंबाला ठार करण्याची धमकी देत भोंदूबाबाकडून 4 महिलांसोबत घाणेरडं कृत्य