मुंबई : Girish Mahajan | तसेच निवासी डॉक्टरांची सोय व्हावी यासाठी वसतिगृह बांधणे आणि जुन्या वसतिगृहांची डागडुजी करण्यात येणार आहे. यासाठी १४६ कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत (Vidhan Parishad Maharashtra) दिली. (Girish Mahajan)
राज्यातील निवासी डॉक्टरांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सदस्य ॲड. निरंजन डावखरे (Adv. Davkhare Niranjan) यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना मंत्री महाजन बोलत होते. यावेळी सदस्य प्रसाद लाड (MLA Prasad Lad), महादेव जानकर (MLA Mahadev Jankar) यांनी उपप्रश्न उपस्थित केला.
मंत्री महाजन (Girish Mahajan) म्हणाले, निवासी डॉक्टरांसाठी असलेल्या 10 हजार खोल्या अपुऱ्या पडत असून, पदवी तसेच पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी नव्याने खोल्या बांधण्यात येणार आहे. मोडकळीस आलेले जे वैद्यकीय वसतीगृह महानगरपालिकेच्या अखत्यारित असतील अशा वसतीगृहांबाबत संबंधित संस्थाना निर्देश देण्यात येतील. तसेच राज्यात वैद्यकीय महाविद्यालयांची संख्या वाढणार असल्याने, वसतीगृहांची संख्याही वाढविण्यात येणार आहे. यासंबंधीत कामे गतीने पूर्ण करण्यास शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री महाजन यांनी सांगितले.
अंबरनाथ येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रस्तावित आहे.
याचबरोबर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील वेतनही वाढविण्यात येणार असल्याची माहिती महाजन यांनी यावेळी दिली.
Web Title :- Girish Mahajan | Government is trying to provide health facilities in remote areas – Girish Mahajan
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
MP Supriya Sule | खडकवासला आणि उजनी धरणातील प्रदूषण रोखण्यासाठी तातडीने उपयोजना करा