जलसंपदा मंत्र्यांचा माणुसकीचा हात

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाइन – श्रीगोंदा नगरपालिकेच्या सभेसाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आज दुपारी औरंगाबादवरून नगरच्या दिशेने येत होते. त्यावेळी पांढरीपुल शिवारात अपघातात जखमी होऊन एक जण रस्त्यावर पडला होता. महाजन यांनी सदर जखमीस उचलून ताफ्यातील गाडीत टाकून नगरला आणले. त्यांच्यावर व्यवस्थित उपचार व्हावेत, यासाठी जिल्हा शल्यचिकित्सकांना सूचनाही देण्यात आली. त्यांची ही माणुसकी नगरमध्ये चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे.

श्रीगोंदा नगरपालिका निवडणुकीची आज प्रचार सांगता होत आहे. त्यानिमित्त जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत श्रीगोंद्यात जाहीर सभा आयोजित करण्यात आलेली आहे. त्यानिमित्त ते औरंगाबादवरून नगरकडे येत होते. पांढरीपूल येथे एका व्यक्तीचा अपघात होऊन जखमी अवस्थेत पडली होती. तेथे बघ्यांची गर्दी खूप झाली होती. ही गर्दी पाहून जलसंपदा मंत्र्यांनी ताफा थांबविला. गिरीश महाजन यांनी इतरांच्या मदतीने जखमीला उचलून स्वतःच्या गाडीत घेतले व त्याला उपचारासाठी नगरला हलविले. त्यानंतर दुसच्या वाहनातून ते श्रीगोंदाकडे रवाना झाले. अपघातग्रस्त व्यक्तीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. मंत्री गिरीश महाजन यांनी जिल्हा शल्यचिकित्सकांशी संपर्क साधून तातडीने उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.