Girish Mahajan | संजय राऊतांच्या आरोपावरुन गिरीश महाजन यांचा पलटवार, म्हणाले – ‘तुम्ही जे पराक्रम केले त्याचे भोग…’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadnavis Government) सूडबुद्धीने काम करत असल्याची टीका खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी केली होती. राऊत यांच्या टीकेवर मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी पलटवरा करत इशारा दिला आहे. तुम्ही जे पराक्रम केले आहेत त्याचे भोग भोगावेच लागतील असा इशारा गिरीश महाजन यांनी राऊतांना दिला आहे. तसेच गेल्या तीन वर्षाच्या काळात आपण काय केलं ते जरा तपासून बघा असा टोला महाजन (Girish Mahajan) यांनी लगावला.

 

गिरीश महाजन (Girish Mahajan) पुढे म्हणाले, नवाब मलिक (Nawab Malik), अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना आतापर्यंत हायकोर्टाने (High Court), सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जामीन (Bail) का दिला नाही? कारण त्यांच्यावर झालेल्या आरोपांमध्ये काहीतरी तथ्य असेल म्हणून कोर्ट त्यांना जामीन देण्यास तयार नाही. तुम्ही जे पराक्रम करून ठेवले ते तुम्हाला भोगावेच लागतील, असा इशारा महाजन यांनी संजय राऊतांना दिला.

 

दरम्यान शनिवारी देखील संजय राऊत यांच्यावर महाजन यांनी घणाघाती टीका केली होती.
संजय राऊत वाटेल ते बोलत असतात. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
लोकही त्यांना ऐकून बोअर झाले आहेत, असं महाजन म्हणाले होते.

 

Web Title :-  Girish Mahajan | maharashtra bjp minister girish mahajan once again criticizes sanjay raut

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Solapur Police | कर्तव्य सोडून पोलिसाचा भरचौकात डान्स, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस कर्मचारी ताब्यात

Tunisha Sharma Death | तुनिषा शर्माच्या पोस्टमॉर्टममध्ये मोठा खुलासा; मृत्यूचे कारण आले समोर

MP Sanjay Raut | ‘… त्या दिवशी संजय राऊत हे शरद पवारांच्या मांडीवर बसलेले दिसतील’, शिंदे गटाच्या आमदाराचा टोला