Girish Mahajan On Shivsena | गिरीश महाजनांचा शिवसेनेवर हल्लाबोल, म्हणाले – ‘काँग्रेस-राष्ट्रवादीपेक्षाही बिकट अवस्था शिवसेनेची होईल’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाइन – Girish Mahajan On Shivsena | राज्यसभा निवडणुकीवरून (Rajya Sabha Elections-2022) देशातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्याने अनेक नेते पक्षावर नाराज आहेत. तर भाजप (BJP) या निवडणुकीत घोडेबाजार करू शकतो असा दावा शिवसेनेने केला आहे. त्याला प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना भाजप नेते गिरीश महाजन (BJP Leader Girish Mahajan) यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ‘भविष्यात काँग्रेस – राष्ट्रवादीपेक्षाही बिकट अवस्था शिवसेनेची होईल,’ असा दावा त्यांनी केला आहे. (Girish Mahajan On Shivsena)

 

गिरीश महाजन म्हणाले, “शॉर्ट टर्मचा विचार करून शिवसेनेने मुख्यमंत्री पद मिळवले. ते मिळवत असताना त्यांनी दीर्घकालीन राजकीय समिकरणांचा विचार केला नाही. जनमानसात शिवसेनेची असलेली प्रतिमा दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. किरीट सोमय्या (Kirit Somaiya), राणा कुटुंबीय (Rana Family) आणि ईडी (ED) या विषयांवरचे शिवसेना कायम बोलत असते. त्यामुळे भविष्यात काँग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीपेक्षाही (NCP) शिवसेनेची अवस्था बिकट होईल,” असेही ते म्हणाले. (Girish Mahajan On Shivsena)

राज्यसभेच्या 6 व्या जागेवर भाजपचाच विजय होईल..
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपने धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी दिली असून ती जागा हमखास जिंकणार असल्याचा दावा करत महाजन म्हणाले की, “आमच्याकडे बहुमत आहे.
त्यामुळे घोडेबाजारचा विषयच येत नाही. संजय राऊत (Sanjay Raut) म्हणतात, बाहेरून आलेल्यांना भाजपने उमेदवारी दिली.
पण आमच्याकडे बोट दाखवताना हाताची इतर चार बोटे तुमच्याकडे आहेत, हे लक्षात असू द्या.
यापूर्वी शिवसेनेने राजकुमार धूत (Rajkumar Dhoot), प्रीतिश नंदी (Pritish Nandy), संजय निरूपम (Sanjay Nirupam) आणि प्रियांका चतुर्वेदी (Priyanka Chaturvedi) यांना उमेदवारी दिली होती.
हे कोणते निष्ठावंत शिवसैनिक होते ?’ असा सवालही त्यांनी केला.

 

‘संजय राऊत हे शिवसेनेचा भोंगा आहे. दररोज सकाळी तो वाजत असतो.
शेतकरी, सर्वसामान्य जनतेविषयी ते कधीच काही बोलत नाही,’ असा टोलाही राऊत यांना महाजन यांनी लगावला.

 

Web Title :- Girish Mahajan On Shivsena | bjp leader and former minister girish mahajan criticised shiv sena and sanjay raut over rajya sabha election 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा