‘आडनाव’ आडवं आलं नाही तर प्रदेशाध्यक्षच झालो असतो, भाजप मंत्र्याचे वक्‍तव्य

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष पदाविषयी मोठा खुलासा केला आहे. त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमधील अनेक बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी रांग लावून उभे असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. प्रदेशाध्यक्ष पदाविषयी बोलताना ते म्हणाले की, या पदावर निवडून येण्यासाठी माझे आडनाव आडवं आल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली.

यावेळी आपल्या राजकीय प्रवासाविषयी बोलताना ते म्हणाले की,’सुरुवातीला अभाविपमध्ये आलो, त्यानंतर भाजप युवा मोर्चाचा गावाचा, तालुक्याचा जिल्ह्याचा अध्यक्ष झालो. राज्यामध्ये सरचिटणीस झालो. मात्र अध्यक्षपद काही मिळाले नाही. त्यावेळी राज्यात प्रमोद महाजन देखील होते. यामुळे दोन महाजन ठेवता येणार नसल्याने मला अध्यक्षपद मिळाले नाही, असेदेखील त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्यात भाजप सरकार उत्तम काम करत असून केंद्राप्रमाणेच जनता राज्यात देखील भाजप सरकारला सलग दुसऱ्यांदा निवडून देईल, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, महाराष्ट्र्रात सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यात राज्यात विधानसभा निवडणूक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.


आरोग्यविषयक वृत्त –

व्यायामाचा आनंद वाढविण्यासाठी ही आहे ‘बेस्ट आयडिया’

‘किकबॉक्सिंग’ने  घालवा राग आणि तणाव

लहान मुलांच्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

कोवळे ‘पिंपळपान’ हृदयातील ब्लॉकेजेसाठी वरदान