…तेव्हा माझी उपोषणाची खोड मोडली : गिरीश महाजन

अहमदनगर : पोलीसनामा ऑनलाईन – राळेगणसिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी उपोषण सोडले. त्यावेळी तेथे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी त्यांनी आपणही उपोषण केले होते. तेव्हाचा एक अनुभव सांगत त्यांनी माझी उपोषणाची खोड कशी मोडली, ते सांगितलं.

उपोषण करणे खूपच अवघड असतं. अण्णांची कमाल आहे. तब्बल २२ उपोषणे त्यांनी केली. आज वयाच्या ८२ व्या वर्षीही तब्बल सात दिवस अण्णांनी उपोषण केले. हे अण्णांना कसं काय जमतं, असं त्यांनी म्हटलं.

मी आमच्या मतदारसंघात एकदा उपोषण केले होते. चार-पाच दिवस झाले, पण माझ्या मागण्या मान्य होईनात. मला तर जेवणावाचून दमच निघत नव्हता. अखेर मीच संबंधित मंत्र्यांना म्हणालो, आता माझे उपोषण सोडवा. काहीतरी आश्वासन द्या, पण उपोषण सोडवा. पण तरीही संबंधित मंत्री आले नाहीत. मग मात्र माझी पंचायत झाली. अखेर मीच उपोषण सोडून घेतले. माझी उपोषणाची खोडच मोडली. यापुढे आपण तर उपोषण करणार नाही. ते मला जमणारही नाही, असा किस्सा त्यांनी यावेळी सांगितलं. त्यानंतर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

दरम्यान, अण्णा हजारे यांनी राळेगणसिद्धी येथे उपोषण करत आहेत. त्यांचे उपोषण सोडण्यासाठी महाजन यांनी विनंती केली. मात्र अण्णांनी काही उपोषण मागे घेतले नाही. अखेर काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागण्या मान्य करत उपोषण सोडविले.