गिरीश महाजन महाराष्ट्राचे नवे ‘मुख्यमंत्री’ ? जाणून घ्या काय आहे ‘सत्य’

जळगाव : पोलीसनामा ऑनलाईन – लोकसभेच्या निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर कार्यकर्त्यांना आता विधानसभेचे वेध लागले आहेत. जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्या समर्थकांना महाजन यांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होण्याची शक्यता त्यांचे कार्यकर्ते वर्तवत आहेत. गिरीश महाजन यांना भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे बॅनर जळगावात लावण्यात आले आहे. जळगावात लावलेल्या बॅनरमुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चेचा विषय ठरला आहे.

अरुण जेटली यांनी प्रकृतिअस्वाथ्यामुळे मंत्रिपदाची जबाबदारी घेण्यास असमर्थता व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे, फडणवीस यांच्या जागी गिरीश महाजन यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ पडू शकते. अशी अपेक्षा महाजन यांचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत. त्याबद्दल समर्थकांनी जळगाव शहरात, महाजन यांना महाराष्ट्राचे लोकनेते व भावी मुख्यमंत्री म्हणून शुभेच्छा देणारे करणारे बॅनर लावण्यात आले आहे.

गिरीश महाजन हे भाजपमधील एक वजनदार नेते आहेत. महाराष्ट्रातील अनेक आंदोलने, मोर्चे यशस्वीरित्या हाताळण्याचं काम गिरीश महाजन यांनी केलं आहे.