धक्कादायक ! मुलीला नशेच्या गोळ्या देऊन केला गँगरेप ; तब्बल 66 व्हिडिओ बनवून केले ‘ब्लॅकमेल’

राजस्थान : वृत्तसंस्था – स्वतःबद्दल आणि आपल्या धर्माबद्दल चुकीची माहिती सांगून पहिल्या वर्षामध्ये शिकणाऱ्या मुलीला जबरदस्तीने हॉटेलमध्ये नेऊन सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी आरोपी मुलाविरूद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पीडित मुलीचा आरोप आहे की, खिरोड झुंझुनू येथील रहिवासी सुरेश उर्फ आसिफने हॉटेलमध्ये नेऊन झोपेच्या गोळ्या खाऊ घातल्या आणि त्यानंतर त्याने आपल्या मित्रांना तेथे बोलावून अनेकदा सामूहिक बलात्कार केला. यानंतर याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल करून त्याने जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप तिने केला. ही खळबळजनक घटना राजस्थानातील सीकर येथील उद्योग नगर पोलिस स्टेशनची आहे.

व्हिडिओ क्लिप आणि फोटो दाखवून मुलाने तिला धमकावण्यास सुरुवात केली तेव्हा मुलीला या प्रकरणाची माहिती मिळाली. त्याने तिच्याकडून बर्‍याचदा पैसेही उकळले. उद्योग नगर पोलीस ठाण्याचे अधिकारी वीरेंद्र शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू केला आहे.

पोलिसांनी सांगितले की पीडित मुलगी सिकर शहरात बी.कॉम. प्रथम वर्षाचा अभ्यास करत आहे. ती बसमध्ये यायची त्यावेळी ती एका मुलाला भेटली. तो तिच्याशी बोलू लागला आणि त्याने आपले नाव सुरेश असे सांगितले. नंतर त्याने तिला जबरदस्तीने हॉटेलमध्ये नेले आणि मित्रांसमवेत सामूहिक बलात्कार केला. याचा व्हिडिओ बनवून याआधारे त्याने तिला ब्लॅकमेल करणे सुरू ठेवले आणि त्यातून २५ हजार रुपये घेतले.

बसमधून जाताना ओळख झाल्यानंतर सुरेशने एक दिवस मुलीच्या मोबाईलवर फोन करून मैत्री करण्यास सांगितले तेव्हा मुलीने नकार दिल्याचे मुलीने स्पष्ट केले. काही दिवसांनंतर त्याने पुन्हा कॉल केला आणि सीकरमधील पेट्रोल पंपाजवळ एक पांढरी बोलेरो उभा होता. त्यात एक महिला आणि इतर व्यक्ती बसली होती. त्यांनी त्या मुलीला जबरदस्तीने बायपासजवळच्या हॉटेलमध्ये नेल्याचा आरोप आहे. येथे सुरेश आणि त्याच्या मित्रांनी तिच्यावर बलात्कार केला आणि गुंगीच्या गोळ्या देऊन या प्रकाराचा व्हिडिओ बनविला गेला. यानंतर सुरेशने व्हिडिओ तिच्या मोबाइलवर पाठविला आणि तिला ब्लॅकमेल केले. अशा प्रकारे त्याच्या बलात्काराचे एकूण ६६ व्हिडिओ बनवले गेले. या संपूर्ण कटात आसिफसमवेत असलेल्या एका महिलेचे नावही मुलीने सांगितले आहे. त्याच महिलेने पीडितेला धमकावले आणि गावच्या स्टँडवर येऊन तिच्याकडून अनेक वेळा पैसे घेतले.

Visit : policenama.com