मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीतून मुलगी परत येत होती, चालत्या कारमध्ये केला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –    पंजाबमधून एक अतिशय लाजीरवाणी घटना समोर आली आहे. मित्राच्या वाढदिवसाची पार्टी साजरी करून परत जात असताना एका मुलीवर तिच्याच मित्रांनी बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही घटना पंजाबच्या लुधियाना येथे घडली आहे.

पीडित मुलीने आपल्या तक्रारीत पोलिसांना सांगितले की, दोन्ही आरोपी तिचे मित्र आहेत आणि एका खासगी हॉटेलमध्ये काम करतात. घटनेच्या दिवशी ते मित्राच्या वाढदिवसाच्या पार्टीला गेले होते. पार्टी झाल्यानंतर ते लुधियानाच्या सराभा नगरमधून परत जात होते, दोन्ही आरोपींनी पीडित मुलीला जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले. त्यानंतर एका आरोपीने गाडी चालविणे चालू ठेवले आणि दुसऱ्या आरोपीने त्या मुलीवर बलात्कार केला. यानंतर तिला कारमधून उतरवून ते पळवून नेले.

पोलिसांनी आरोपींविरोधात फौजदारी गुन्हा दाखल केला असून या दोन्ही आरोपींना अटक केली आहे. घटनेत सामील असलेली गाडी ताब्यात घेतल्याची माहिती सराभा नगर पोलीस स्टेशन प्रभारी यांनी दिली आहे. पोलिस आता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात व्यस्त आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like