एसपी महाविद्यालयाजवळ तोंड बांधलेल्या तरुणाने केला मुलीचा विनयभंग

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – तोंड बांधलेल्या तरुणाने अश्लिल हावभाव करत एका तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसपी महाविद्यालयाजवळ ही घटना घडली असून तरुणाला अटक केली आहे. याप्रकरणी २२ वर्षीय तरुणीने फिर्याद दिली आहे. त्यानुसार निखील फाटे (वय २५, रा. दांडेकर पूल) याला अटक करण्यात आली आहे. दत्तवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी ही एसपी कॉलेजजवळील मुलांच्या वसतीगृहाजवळून जात होती. त्यावेळी एक तरुण त्या ठिकाणी तोंड बांधून उभा होता. तरुणी जात असताना त्याने अश्लिल हावभाव करून तिचा विनयभंग केला. याप्रकरणी तक्रार दिल्यानंतर दत्तवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलिस अधिक तपास करत आहेत.

Visit : Policenama.com