सांगली : ‘त्या’ युवतीचा मृतदेह सापडला

सांगली : पोलीसनामा ऑनलाईन – शहरातील कृष्णा नदीवरील आयर्विन पुलावरून उडी मारलेल्या युवतीचा मृतदेह रविवारी सापडला. त्या युवतीने दि. ८ जुलै रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास कृष्णा नदीत उडी घेतली होती. सात दिवस शोधकार्य सुरू होते.

ऐश्‍वर्या राजू खोत (वय १८, लक्ष्मीनगर, सांगली) असे तिचे नाव आहे. शहरातील वसंतदादा साखर कारखाना परिसरातील दडगे प्लॉट येथे ती रहात होती. कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाजवळ सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास ती आली होती. त्यावेळी तिने तिच्याजवळील मोबाईल पाण्याच्या पाईपवर ठेवला आणि नदीत उडी घेतली. हा प्रकार एका महिलेने पाहिला. तिला अडविण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यापूर्वीच तिने उडी घेतली. त्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तेथे त्या मुलीचा मोबाईल सापडला.

गेल्या सात दिवसांपासून कृष्णेच्या पात्रात तिचा शोध सुरू होता. रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास हरिपूर येथे काही मच्छीमारांना पाण्यात मृतदेह असल्याचे दिसून आले. त्यानंतर शहर आणि ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कुटूंबियांनी तिचा मृतदेह ओळखला. येथील शासकीय रुग्णालयात उत्तरीय तपासणी केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

आरोग्यविषयक वृत्त 

विज्ञान आणि आयुर्वेद सांगतं ‘या’ पदार्थाने करा जेवणाची सुरूवात, ‘हे’ फायदे होतात

गुलाबाच्या फुलाचे अशाप्रकारे सेवन ‘या’ आजारांसाठी उपयुक्‍त, जाणून घ्या

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

‘हे’ उपाय केल्यास ‘गॅस्ट्रिक ट्रबल’मध्ये त्वरित मिळेल आराम, औषध घेण्याची गरज नाही

दात मजबुत आणि पांढरे शुभ्र राहण्यासाठी ‘या’ ८ पदार्थांचं सेवन नक्‍की टाळा

मोड आलेल्या कडधान्याचं सेवन केल्यास होतात ‘हे’ 5 फायदे, जाणून घ्या

बाहेरच्या फळांच्या ज्यूसमुळं आरोग्य बिघडतं, ‘ही’ 5 प्रमुख कारणं

कच्चे ‘अंडे’ खा आणि ‘हे’ ४ फायदे मिळावा

वजन कमी करण्याचे ‘हे’ १५ रामबाण उपाय, घाम देखील येणार नाही

स्तनाच्या कर्करोगाची ‘ही’ ६ लक्षणं, जाणवल्यास ‘हे’ ४ उपाय तात्काळ करा, जाणून घ्या