धक्कादायक ! ‘या’ 26 वर्षीय मुलीला येतात पुरूषांसारख्या दाढी आणि मिशा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पुरुषांमध्ये दाढी आणि मिशांची क्रेज मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे अनेक तरुण दाढी मिशा आवडीने ठेवतात. मात्र दाढी मिशा ठेवणारी महिला कधी पाहिलीय का ? कदाचित हे वाचून तुमचा विश्वास बसणार नाही. परंतु हे खरे आहे.

या मुलीला दाढी मिशा ठेवायला खूप आवडतात. एवढेच नाही तर पुरुषांपेक्षा ही तरुणी आपल्या दाढी मिशांची निगा राखते. नोवा गैलेक्सिया लहानपणापासूनच पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम म्हणजेच PCOS नामक आजराने ग्रस्त आहे. अमेरिकन रहिवाशी असलेली नोवा केवळ २६ वर्षांची आहे. हे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल की, नोवा आपल्या लहानपासून म्हणजे शाळेत असल्यापासूनच दाढी करत असे.

या आजारामुळेच स्त्रियांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात केस येतात. सुरुवातीला नोवाला यामुळे खूप लाज वाटत होती मात्र आता नोवाला आपल्या दाढी मिशा एवढ्या आवडतात की, कदाचितच एखाद्या पुरुषाला इतक्या दाढी मिशा आवडत असतील.

नोवा ने सांगितले की, सुरुवातीला तिला घरातून निघण्यापूर्वी शेव करावी लागत असे नाहीतर तिला खूप लाज वाटत असे. २०१७ साली नोव्हेंबर महिन्यात नोवा ने नो शेवचा निर्णय घेतला आणि बिल्कुलही दाढी केली नाही. त्यानंतर तिला जाणवले की, उगाच लोक काय म्हणतील याचा विचार करत ती आपला वेळ वाया घालवत आहे आणि त्यानंतर नोवा ने ठरवले की, ती जशी आहे तशीच सगळ्यांसमोर जाणार. आता नोवाला आपली दाढी मिशा इतक्या आवडतात की ती आता दाढी करायला तयार नाही.

आरोग्यविषयक वृत्त –

You might also like