15 वर्षाच्या मुलीनं दिला बाळाला जन्म, पित्याचे नाव ऐकून डॉक्टर ‘हैराण-परेशान’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशातील कन्नोजमध्ये वडिलांनी मुलीच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. येथील एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी एका मुलाची आई झाली. मात्र त्यानंतर डॉक्टरांनी तिला बाळाच्या पित्याचे नाव विचारले असता डॉक्टरांच्या पायाखालची देखील जमीन सरकली. या अल्पवयीन मुलीने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या या बाळाचा पिता दुसरा तिसरा कुणी नसून खुद्द तिचा पिता आहे.

आपल्या या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून हा नराधम बाप या मुलीला अवघड अवस्थेत दवाखान्यात सोडून पळून गेला. त्यानंतर आता पोलीस त्या नराधमाचा शोध घेत आहेत. या मुलीने बाळाला जन्म दिला असला तरी तिची परिस्थिती धोक्यात आहे. तिने सातव्या महिन्यात मुलाला जन्म दिल्यामुळे तिची प्रकृती चिंताजनक आहे. मुलीच्या या परिस्थितीत आशा ज्योती केंद्रातील महिला कर्मचारी या नवजात बाळाची काळजी घेत आहेत. त्याचबरोबर या केंद्रातील डॉक्टर देखील तिची सध्या कुटुंबाप्रमाणे काळजी घेत आहेत.

दरम्यान, जर सख्खा बापाचं जर वैरी बनत असेल तर या अल्पवयीन मुलींनी काय करायचे असा प्रश्न सध्या सर्व स्तरातून उपस्थित केला जात आहे. त्याचबरोबर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदविला असून या फरार नराधम बापाचा शोध घेतला जात आहे.

आरोग्यविषयक वृत्त –