धक्कादायक ! बापाच्या अनैतिक संबंधांना कंटाळून पत्नीसह मुलींची आत्महत्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – वडिलांच्या बाह्य संबंधांना कंटाळून दोन मुलींनी त्यांच्या आईसह आत्महत्या केली आहे. बंगळुरुमध्ये पोलीस तपासानंतर हे सत्य उघड झाले. आत्महत्या करणाऱ्या मुलीने आपल्या वडिलांप्रति एक स्टेट्स देखील व्हाॅट्सअ‍ॅपला ठेवले होते. या स्टेट्समध्ये ‘असा बाप कोणालाही मिळू नये’ असे लिहिले आहे. याच व्हॉट्सअ‍ॅपमुळे हे प्रकरण उलगडणे पोलिसांना सोपे गेले.

यातील मनसा या मुलीने व्हॉटसअ‍ॅपवर स्टेटस ठेवले होते, ज्यात लिहिले होते की ‘वडिलांनी आमचे आयुष्य बर्बाद केले, सिद्धैय्या हाच आमच्या मृत्यूला जबाबदार आहे’ असे मनसाने ठेवलेले स्टेटस मुलीच्या मामाने म्हणजेच पुट्टूस्वामीने पाहिले होते. त्याने ते पाहिल्यानंतर तिला फोन करण्याचा प्रयत्न केला. या तिघींनी आत्महत्या केली होती. फोन न उचलल्याने पुट्टूस्वामीने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला.

पोलिसांना मंगळवारी एका महिलेने तिच्या मुलींसह आत्महत्या केल्याची माहिती मिळाली होती. पोलीस जेव्हा गांधी बाजारमधल्या त्यांच्या घरी पोहचले तेव्हा त्यांना घराच्या गच्चीवर तिघींचे मृतदेह आढळून आले. राजेश्वरीने तिच्या १७ वर्षांच्या मनसा आणि १५ वर्षांच्या भूमिकासोबत जीवन संपवले.

या मुलींचे वडिल सिद्धैय्या याचे दुसऱ्या एका महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या महिलेसाठी त्याने बायको आणि मुलींना सोडून दिले होते. घरातल्यांच्या मध्यस्थीनंतर राजेश्वरी (पत्नी) मुलींसोबत त्याच्यासह राहाण्यास तयार झाली होती. तरीही त्याने दुसऱ्या महिलेशी असलेले संबंध कायम ठेवले होते. यावरून रोज घरात भांडणे होत होती. या सगळ्याला कंटाळून या तिघींनी आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like