आगीत होरपळून मुलीचा मृत्यू

कोल्हापूर : पोलीसनामा ऑनलाईन

वाढदिवसाच्या दिवशीच घराला लागलेल्या आगीत सोळा वर्षाच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाल्याची हदयद्रावक घटना कोल्हापुरातील भुदरगड तालुक्यातील सोनारवाडी येथे घडली आहे. अपूर्वा शिवाजी ऱ्हाटवळ असे या मुलीचे नाव आहे. या घटनंनतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. आग्निशमन दलाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. परंतु, तत्पुर्वीच या मुलीचा मृत्यू झाला होता. सुदैवाने तिची मोठी बहिण या दुर्घटनेतून बचावली आहे.
[amazon_link asins=’B078124279′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’4cf5beee-c153-11e8-88d9-e30e33f0589a’]
याबाबत अधिक माहिती अशी, की सोनारवाडी येथील बसस्थानाकाजवळ शिवाजी ऱ्हाटवळ यांचे घर असून पत्नी, दोन मुली तसेच एका मुलासोबत ते राहतात. अपूर्वाची तब्बेत ठीक नसल्याने ती शाळेला गेली नव्हती. ती इयत्ता दहावीत शिकत होती. शिवाजी ऱ्हाटवळ आणि त्यांची पत्नी शेतामध्ये गेले होते. तर अपूर्वासोबत तिची मोठी बहिणही घरामध्ये होती. दुपारी अचानक घराला शॉर्टसर्किटने आग लागली. यावेळी अपूर्वा घराच्या माळ्यावर अभ्यास करत बसली होती. याठिकाणी जळाऊ लाकूड आणि गवत असल्याने आग मोठ्याप्रमाणात पसरत गेली. अपूर्वा माळ्यावरच अडकल्याने तिला खाली उतरता आले नाही, त्यामुळे तिचा आगीत होरपळून मृत्यू झाला. अपूर्वाच्या मोठ्या बहिणीने सुद्धा आग विझविण्याचा प्रयत्न केला पण तिला काही करता आले नाही. घराच्या छतावरून आगीचे लोट बाहेर येत असल्याचे पाहून स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाला बोलवून आग विझवण्याचा प्रयत्न केला. पण आगीचे रूप एवढे भयानक होते, की यामध्ये घरातील प्रापंचिक साहित्याची राख झाली. यावेळी अपूर्वाच्या आई वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता.