5 वर्षांपासून ‘पिंजऱ्यात’ कैद आहे मुलगी, ज्या अवस्थेत राहते ते जाणून व्हाल ‘भावुक’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – स्वातंत्र्य हा प्रत्येक मानवाचा पहिला हक्क आहे. निर्दोष माणसाला कैद करण्याचा अधिकार कोणालाही नाही. पण फिलिपिन्सच्या एका मुलीला गेल्या पाच वर्षांपासून कोणताही दोष नसताना पिंजऱ्यातच राहावे लागत आहे. एवढेच नव्हे तर बंदिवासात ठेवलेली ही मुलगी कपडे देखील पोत्यापासून बनविलेले परिधान करते. मॉडेल होण्याचे स्वप्न पाहताना परिस्थिती अशी बनली की ती इतके दयनीय जीवन जगत आहे. जो कुणी तिच्याबद्दल जाणून घेत आहे तो भावुक होत आहे.

फिलिपिन्समध्ये राहणाऱ्या या 29 वर्षीय मुलीला गेल्या पाच वर्षांपासून दुसऱ्या कुणी नाही तर तिच्या कुटुंबीयांनीच पिंजऱ्यात बंद करून ठेवले आहे. तिला तेथेच अन्न आणि पाणी दिले जाते. हे असे तिची असंतुलित मानसिक स्थिती लक्षात घेऊन केले जात आहे. घरातील सदस्यांच्या म्हणण्यानुसार बेबी पूर्वी अशी नव्हती. ती एक खूप आनंदी जीवन व्यतीत करणारी मुलगी होती जी पदवीनंतर मॉडेल होण्याचे स्वप्न पाहत होती. पण 2004 मध्ये अचानक तिला डिप्रेशनचे झटके येऊ लागले. मानसिकदृष्ट्या ती इतकी आजारी पडली की तिने स्वतःसह इतरांना देखील त्रास देणे सुरू केले.

बेबीची औषधे बंद झाली आणि ती पुन्हा आजारी पडली
बेबीच्या कुटुंबीयांनी तिला रुग्णालयात दाखल केले, जिथे तिच्यावर उपचार करण्यात आले. बरे झाल्यानंतर काही दिवसांनंतर तिच्या वडिलांची तब्येत ढासळली, जे घरात एकटेच कमावणारे व्यक्ती होते. वडील आजारी पडताच बेबीची औषधे बंद झाली आणि ती पुन्हा आजारी पडली. ती लोकांवर धावून जाऊ लागली, कधी शेजार्‍यांवर दगडफेक करायची तर कधी कुणावर हल्ला करायची. आता कुटुंबाकडे एवढे पैसे नव्हते की पुन्हा बेबीवर उपचार करण्यात येतील.

बेबीची हिंसक वागणूक पाहून तिच्या कुटुंबीयांनी तिला सुरक्षित ठेवण्यासाठी खोलीत बंद केले. पण खोलीतही बेबी काहीतरी गोंधळ करतच असायची. ज्यानंतर अस्वस्थ होऊन घरातील लोकांनी तिला पिंजऱ्यात टाकले. पण यानंतर बेबी घातलेल्या कपड्यांना देखील चघळायची, तर कधी कधी कपडे फाडून टाकायची. त्यानंतर कुटुंबीयांनी तिला पोत्यापासून बनविलेले कपडे घालण्यास सुरुवात केली कारण ती पोत्याला चघळत नसायची.

बेबीच्या परिस्थितीवर दया दाखवत कुटुंबातील एका ओळखीच्या व्यक्तीने पिंजऱ्यात कैद केलेल्या बेबीचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकला. त्यांनी लोकांना उपचारासाठी पैसे द्यावे असे आवाहन केले. बेबीचा हा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाला आहे. लोक आता तिला मदत करण्याविषयी बोलत आहेत.