मुखाग्नी देण्याची तयारी सुरु असताना ‘ती’ तरुणी झाली जिवंत अन् पुढं झालं ‘असं’ काही

भरतपूर (राजस्थान) : वृत्तसंस्था – सर्पदंश झाल्याने तरुणीला तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. नातेवाईकांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी करून मृतदेह स्मशानभूमित नेण्यात आला. मात्र, अगदी शेवटच्या क्षणाला या युवतीचा श्वास सुरु झाला आणि ती उठून बसली. मुलीच्या मृत्यूमुळे तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. मात्र, ती अचानक उठून बसल्याने कुटुंबामध्ये आनंद पसरला. हा प्रकार राजस्थान येथील भरतपूरमध्ये घडला.

भरपूरमध्ये राहणाऱ्या एका 21 वर्षीय श्वेता या तरुणीला सर्पदंश झाला. त्यामुळे तिला भरतपूरच्या आरबीएम रुग्णालायात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केल्याने तिच्या कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला. तिच्या मृत्यूची बातमी नातेवाईकांना कळवून मृतदेह घरी आणण्यात आला. नातेवाईकांनी तिच्या अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली. तिचा मृतदेह नातेवाईकांनी स्मशानभूमीत घेऊ गेले.

स्मशानभूमीमध्ये श्वेताच्या अंतिमसंस्काराची तयारी सुरु असताना अचानक तिचा श्वास घेणे सुरु झाले. ती श्वास घेण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात येताच तिची नाडी तपासण्यात आली. नाडी तपासली असता ती जिवंत असल्याचे समोर आले. शिवाय, काही वेळातच ती उठून बसली. मृत मुलगी अचानक उठून बसल्याचे पाहून दु:खात बुडालेल्या नातेवाईकांना आनंदाचा धक्का बसला. मृत मुलगी जिवंत झाल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली असून सध्या श्वेताच्या मृत्यू आणि जिवंत होण्याची चर्चा रंगू लागली आहे.

Visit – policenama.com