दुर्देवी ! कोरोनानं आई दगावल्याचे ऐकताच मुलीची इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या; लोकं Video काढण्यात व्यस्त

पाटणा : वृत्तसंस्था – कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक लोकांची परिस्थिती बिकट झाली आहे. अनेक लोकांनीं आपला प्राण गमावला आहे. तर मध्यप्रदेश येथील रायसेन जिल्ह्यात एक धक्कदायक घटना घडली आहे. एका दिवसाआधी एका महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तर ही घटना तिच्या मुलीने ऐकल्यावर तिला धक्काच बसला या धक्क्यात त्या मुलीने इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केलीय. रितिका असे त्या तरुणीचे नाव आहे.

अधिक माहितीनुसार, तेथील २३ वर्षीय तरुणी मंडिदीप ठाणा क्षेत्रातील हिमांशू मेघा सिटी कॉलनीतील राहत होती. एका दिवसापूर्वीच रितिकाच्या आईचा कोरोनानं मृत्यू झाला. यामुळे रितिकाला मोठा धक्का बसला होता. याच दुखातून तिनं आपल्या फ्लॅटच्या बालकणीमधून खाली उडी घेतली. तिच्या घरच्यांनी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र काही वेळ रितिका बालकणीमध्ये लटकलेल्या अवस्थेत होती. हे सर्व बघून खाली लोकांची गर्दी जमा झाली मात्र कोणीही तिला वाचवण्यासाठी पुढे आलं नाही मात्र तेथील सर्व लोक व्हिडिओ काढण्यात व्यस्त होते. काही वेळातच रितिका खाली कोसळली. यानंतर ती गंभीर जखमी झाली. रितिकाला उपचारासाठी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं गेलं, परंतु उपचारादरम्यानच तिचा मृत्यू झाला होता.

दरम्यान, उपस्थित असलेल्या लोकांनी व्हिडिओ बनवण्याऐवजी रितिकाची मदत करण्यासाठी पुढे सरसावले असते तर कदाचित या मुलीचा प्राण वाचला असता. इथे केलेला व्हिडिओ मधून लोक समोर दिसत आहेत.