धक्कादायक ! सॅनिटायजर प्राशन करत मनगटाची नस कापून तरुणीची आत्महत्या, नाशिकमधील घटना

नाशिक : पोलीसनामा ऑनलाइन –   आईला भेटायला आलेल्या एका 20 वर्षीय तरुणीने अर्धा लिटर सॅनिटाईजर प्राशन करत दोन्ही हाताच्या मनगटाची नस कापून आत्महत्या केली आहे. नाशिकच्या बिटको रुग्णालय परिसरात ही घटना घडली आहे. तिच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

शिवानी लक्ष्मण भुजबळ (20 रा. आशेवाडी, ता. दिंडोरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिवानी ही रविवारी बिटको रूग्णालयात आली होती. सकाळी तीने रूग्णालयाच्या आवारात अर्ध्या लिटर सॅनिटाईजर प्राशन केले होते. त्यानंतर धारदार शस्त्राने दोन्ही मनगटावर वार करून घेतल्याने ती गंभीर जखमी झाली होती. तिला गंभीर अवस्थेत जिल्हा शासकीय रूग्णालयात दाखल केले होते. मात्र तिची प्रकृती खालावल्याने नातेवाईकांनी तिला खासगी रुग्णालयात हलवले होते. उपचारादरम्यान सोमवारी (दि. 3) दुपारी तिचा मृत्यू झाला. या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.