हसत-हसत विवाहितेने नदीत मारली उडी, आत्महत्येपूर्वी शेअर केला Video

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – गुजरातच्या अहमदाबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका विवाहित महिलेने साबरमती नदीत उडी मारून आत्महत्या केली आहे. त्यात, आत्महत्या करण्यापूर्वी तिने एक व्हिडिओही सोशल मीडियावर शेअर केला होता. ज्यात तिने म्हटले की, ” जितनी भी जिंदगी मिली, सुकून है. अब वह खुदा से मिलना चाहती है” आत्महत्येच्या घटनेची माहिती मिळताच रिव्हरफ्रंट पोलिस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केला.

आयशा तिच्या व्हिडिओमध्ये म्हणाली, ‘हॅलो, माझे नाव आयशा आरिफ खान आहे. मी जे काही करणार आहे, ते माझ्या इच्छेनुसार मी करणार आहे. यात कोणाचाही दबाव नाही. असं समजा कि, अल्लाह ने दिलेलं आयुष्य इतकंच होतं आणि मला हे आयुष्य खूप समाधानानं मिळालं. आणि बाबा, कधी पर्यंत लढणार? केस विड्रॉल करा.’

आयशा पुढे म्हणाली, ‘एक गोष्ट नक्कीच शिकले आहे कि, प्रेम करायचे असेल तर दोन्ही बाजूने करा, कारण एकतर्फी प्रेमात काहीही साध्य होत नाही. प्रेम तर निकाहनंतरही अपूर्ण राहत. प्रिय नदी, मला तुझ्यात मला सामावून घे आणि माझ्या मागे जे काही होईल, कृपया जास्त वाद निर्माण व्हायला नको. तसेच ती पुढे म्हणाली कि, ‘मी वाऱ्यासारखी आहे, सतत वाहायचे आहे. कोणासाठीही थांबायचे नाही, मला आनंद आहे की या दिवशी मला ज्या प्रश्नांची उत्तरे हवी होती ती सापडली आहेत. मला ज्याला सांगायचे होते ते मी सांगितले आहे. धन्यवाद, मला प्रार्थनेत लक्षात ठेवा. माहित नाही, जन्नत मिळेल ना मिळेल. चलो अलविदा’.

दरम्यान, अहमदाबादमध्ये राहणाऱ्या आणि व्यवसायाने टेलर आयशाचे वडील लियाकत अली यांनी सांगितले की, त्यांचा मुलीचा 2018 मध्ये जलोर (राजस्थान) येथे राहणाऱ्या आरिफ खानशी निकाह झाला. लग्नानंतरच हुंड्यासाठी तिचा छळ केला जात असल्याचा आरोप वडिलांचा आहे. पैसे दिल्यानंतर आरिफच्या कुटुंबाचा लोभ वाढल्याचा आरोपही लियाकत अली यांनी केला आहे. काही महिन्यांपूर्वी आरिफने पुन्हा आयशाला अहमदाबादमध्ये सोडले. आरिफ आयशाशी फोनवर सुद्धा बोल्ट नव्हता. काही दिवसांपूर्वी आयशाने रागाने आत्महत्या करण्याची धमकी दिली होती. यावर आरिफने उत्तर दिले की तुला मरायचे असेल तर मर जा.