पाणी समजून डिझेल प्याला ; दीड वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – स्वयंपाक करण्यासाठी स्टो मध्ये भरण्यासाठी रॉकेल ऐवजी आणलेले डिझेल पाणी समजून पिल्याने दीड वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्देवी मृत्यू झाला. हा प्रकारदेहूगाव, विठ्ठलवाडी येथे शुक्रवारी घडला.

वेदांत गौतम गायकवाड (वय दीड वर्ष, रा. विठ्ठलवाडी, देहूगाव) असे मृत्यू झालेल्या चिमुकल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांतच्या घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. घरातील स्वयंपाक बनविण्यासाठी आई स्टो चा वापर करते. रॉकेल मिळत नसल्याने स्टो पेटवण्यासाठी वेदांतची आई डिझेलचा वापर करत होती. बुधवारी वेदांतच्या आईने स्टोमध्ये डिझेल टाकले आणि शिल्लक राहिलेले डिझेल तसेच बॉटल मध्ये ठेवले.

वेदांत खेळत असताना पाणी समजून बॉटल मधील डिझेल प्यायला. हा प्रकार लक्षात येताच त्याला उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा आज शुक्रवारी मृत्यू झाला.