अतिउत्साहात अल्पवयीन मुलीने केला सेक्स ; गमावला जीव

लंडन : वृत्तसंस्था – सेक्सबद्दल अनेक वयात येणाऱ्या मुला मुलींना कमालीची उत्सुकता असते. यामुळे ते काय करतील याचा काही भरवसा नाही. एका  17 वर्षीय मुलीने उत्साहाच्या भरात तिच्याच मित्रासोबत सेक्स केला आणि तिला हे चांगलंच महागात पडलं. तिला आपला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे वर्गात फर्स्ट येणारी अशी ती हुशार मुलगी होती.

सदर मुलगी अभ्यासात अतिशय हुशार असून ती वर्गात पहिली यायची. इतकेच नाही तर तिचे वडिल चांगले सर्जन आहेत.  इंग्लंडच्या बर्मिंघम शहरातील एका शाळेत शिकत होती. वर्गातील मुलांचे म्हणणे आहे की, ती शाळेत नशा करून येत होती. तसेच इतर मुलींपेक्षा ती पूर्णपणे वेगळी होती. इतकेच नाही तर  शाळेत नशेमध्ये राहत असल्यामुळे तिचे हेडटीचर आणि वडिलांसोबत नेहमीच खटके उडत होते. तिला नशेची सवय कशी लागला हे तिच्या मित्रांना देखील माहीत नव्हते.

तिच्या वर्गातील मुले असेही म्हणाले की, फक्त एंजॉयमेंट करण्याचा तिच्या आयुष्याचा उद्देश होता. आणि याच एंजॉयमेंट करण्याच्या नादात तिला आपला जीव गमवावा लागला आहे असेही त्यांनी सांगितले. समोर आलेल्या माहितीनुसार, एकदा सुट्टी असताना ती आपल्या 19 वर्षीय मित्रासोबत सेक्स करत होती. याचदरम्यान तिला कार्डियक अटॅक आला आणि ती बेशुद्ध पडली.  त्यानंतर तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. ज्या रुग्णालयात तिला नेले तेथे तिचेच वडील सर्जन होते. त्यांनी तिला वाचविण्याचा पूर्ण प्रयत्न केला पण प्रयत्न निष्फळ ठरले. दरम्यान तिच्या रक्तात कोकीनचे प्रमाण अधिक प्रमाणात असल्याचे तपासणी दरम्यान आढळून आले आहे. या नशेमुळेच तिचा जीव गेल्याचे समजत आहे.