१९ वर्षीय मुलीने यकृत दान करून वाचविले वडिलांचे प्राण

कोलकाता : वृत्तसंस्था – वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी १९ वर्षीय मुलीने यकृत दान केले आहे. कोलकाता येथील रहिवाशी राखी दत्ता असे त्या मुलेचे नाव आहे. राखीच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे सर्वत्र कौतुकांचा वर्षाव होत आहे.

प्रसिद्ध उद्योगपती हर्ष गोयंका यांनी गेल्या आठवड्यात एक ट्विट केले होते. त्यामध्ये त्यांनी बाप-लेकीचा फोटो पोस्ट केला आणि त्यावर त्यांनी कोलकाता मधील १९ वर्षीय राखी दत्ता या तरुणीने आपल्या वडिलांना यकृताचा त्रास सुरू होता म्हणून यकृताचा ६५ टक्के भाग दान केला आहे. उद्योगपती हर्ष गोयंका यांनी विट केलेल्या त्या फोटो मध्ये वडिल आणि राखीच्या सर्जरीच्या खुणा दिसता आहेत. राखीनं वडिलांसोबत सर्जरीच्या खुणा दाखवत फोटो क्लिक केला आहे. तो फोटो सोशल मीडियावर इतका व्हायरल झाला आहे की सर्वस्तरावरून कौतुकांचा वर्षाव होत आहे.

विशेष म्हणजे, राखीच्या या कौतुकास्पद कामगिरीमुळे बाप – लेकीचे नाते कसे असते हे दिसून आले आहे. बाप लेकीला जग दाखवतो परंतु इथे लेकीनेच बापाला पुनर्जन्म देऊन जग दाखवले आहे.