भावानं 10 वर्षाच्या मुलीवर केला ‘रेप’, 8 महिन्याची ‘गरोदर’, तुरूंगवास नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 10 वर्षांच्या एका मुलीने आपले पोट दुखत असल्याचे आपल्या आईला सांगितले तेव्हा तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. रुग्णालयात तपासणीनंतर समोर आले की ही अल्पवयीन मुलगी 8 महिन्यांची गर्भवती आहे. मुलगी गर्भवती असल्याचा खुलासा झाल्यानतंर डॉक्टरांनी पोलिसांना ही माहिती कळवली. त्यानंतर समोर आले की मुलीच्याच भावाने मुलीवर बलात्कार केला होता. हे प्रकरण अर्जेंटिनाच्या पसोडास येथील आहे.

एका रिपोर्ट नुसार डॉक्टारांनी केलेल्या तपासणीनंतर पीडित मुलीने सांगितले की तिच्या 15 वर्षांच्या भावाने तिचा बलात्कार केला आहे. आता याप्रकरणी न्यायालयाकडून तपास करण्यात येत आहे. स्थानिक कायद्यानुसार अल्पवयीन मुलांवर गुन्हा दाखल करण्यात येत नाही.

पहिल्यांदा पीडित मुलीला काय झाले हे लक्षात आले नाही परंतू तिने भावाने लैंगिक शोषणची माहिती दिली. समाज विकास विभागाकडून आरोपी भावाला कुटूंबापासून वेगळे करण्यात आले आहे.

बाल विकास विभागाचे प्रमुख अना मारिया पेरिरा यांनी सांगितले की पीडित मुलीला गर्भवती असल्याने तिला तसेच तिच्या मुलाला धोका आहे. ते म्हणाले की जन्मानंतर मुलाच्या आजीकडे मुलाला सोपावण्यात येईल.

पीडित मुलीबरोबर घरात अशी काही घटना घडली याची माहिती नव्हती. मुलगी अचानक गर्भवती झाल्याने आई हैराण झाली. परंतू स्थानिक कायद्यानुसार आरोपी भावावर तो अल्पवयीन असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला नाही.

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like