डोंबिवलीत लोकलमधून पडून 22 वर्षीय तरुणीचा मृत्यू

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – मुंबईत दररोज रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या अपघाताचे प्रकार अनेकवेळा समोर आले आहेत. अशीच एक घटना आज सोमवारी पुन्हा एकदा डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान घडली. डोंबिवलीत 22 वर्षीय तरुणीचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. ही घटना डोंबिवली ते कोपर स्थानकादरम्यान आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमार घडली.

चार्मी प्रसाद असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. प्रचंड गर्दीमुळे तोल जाऊन रेल्वेतून पडून चार्मी प्रसाद हिचा मृत्यू झाला. चार्मी आज सकाळी 8.53 मिनिटाची लोकल पकडून चालली होती. परंतू लोकल गच्च भरली होती. लोकल गच्च भरल्यामुळे चार्मी बाहेर लटकून राहिली. परंतू कोपर स्टेशनजवळ तोल जाऊन ती रेल्वेतून खाली कोसळली. या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

मुंबईत लोकलला असलेल्या गर्दीचा मुद्दा सुप्रिया सुळे यांनी नुकताच संसदेत मांडला होता. डोबिंवलीच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असल्याचे सांगत खासदार सुप्रिया सुळे यांनी रेल्वे मंत्रालयाला पुढाकर घेऊन काहीतरी उपाय योजना राबवण्यास सांगितले होते. त्यानंतर आज पुन्हा एकदा डोंबिवलीच्या लोकलमधील गर्दीने तरुणीचा जीव घेतला.

फेसबुक पेज लाईक करा : https://www.facebook.com/policenama/