दुर्दैवी ! 3 वर्षांच्या चिमुकलीचा शाळेच्या मध्यान्न भोजनाच्या पातेल्यात पडून मृत्यू

मिर्झापूर : वृत्तसंस्था – शाळेत शिजवलेल्या मध्यान्न भोजनाच्या गरम पदार्थाच्या मोठ्या पातेल्यात पडल्याने एका चिमुकलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्याच्या एका गावातील ही शाळात आहे. जिल्हा प्रशासनाने या शाळेच्या मुख्याध्यापकाला निलंबित करण्याचे आश्वासन दिले आहे. मृत चिमुकलीचे वय अवघे 3 वर्षे असून घटनास्थळी ठेवण्यात आलेल्या बांधकाम साहित्यावरून ही चिमुकली मध्यन्न भोजनाच्या पातेल्यामध्ये पडली.

या मुलीच्या वडीलांनी आरोप केला आहे की, हे मध्यन्न भोजन बनविणार्‍या व्यक्तीने हेडफोन घातल्याने मुलगी पातेल्यात पडल्यानंतरही त्याचे लक्ष नव्हते. जेव्हा त्यांना हा प्रकार दिसला तेव्हा ते घाबरून दूर पळाले, असे या चिमुकलीच्या वडीलांनी सांगितले. मिर्झापूरच्या प्राथमिक शिक्षण अधिकार्‍यांनी ही मुलगी आमच्या शाळेतील विद्यार्थीनी नव्हती, असे सोमवारी सांगितले. परंतु, नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर एका अधिकार्‍याने सांगितले की, या मुलीची नाव प्रशासनाच्या अंगणवाडीमध्ये अधिकृतपणे नोंदलेले आहे.

ही शाळा रामपूर अटारी गावात आहे. पुर्व उत्तर प्रदेशातील मिर्झापूर शहरापासून सुमारे तासाभराच्या अंतरावर ही शाळा आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासनाने याबाबत योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. जिल्हाधिकारी सुशिल कुमार पटेल यांनी सोमवारी सांगितले की, शाळेच्या मुख्याध्यापकांना ताबडतोब निलंबित केले जाईल. शिक्षणाधिकार्‍यांना याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यास सांगितले आहे, असे पटेल म्हणाले. प्राथमिक शिक्षण अधिकार्‍याने नंतर घुमजाव करत म्हटले की, प्रभाग अधिकार्‍यांचा अहवाल आल्यानंतर या प्रकरणाची चौकशी केली जाईल. अशाच घटनेन एका 6 वर्षाच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना नोव्हेंबरमध्ये कुरनूल, आंध्रप्रदेश येथे घडली होती. हा मुलगा धावत असताना गरम-गरम सांभार असलेल्या मोठ्या पातेल्यात पडला होता. तातडीने वैद्यकीय उपचार करूनही तो वाचला नव्हता.