सुट्टीवर ‘एन्जॉय’ करण्यासाठी निघालेल्या मुलीला 12 जणांनी पाजलं ‘मद्य’, ‘क्रूज’वर केला बलात्कार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सुट्टीचा आनंद घेण्यासाठी निघालेल्या एका अल्पवयीन मुलीवर बारा जणांनी सामुहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पिडीत मुलगी परिवारासह रॉयल कॅरेबियन कंपनीच्या ओसीस ऑफ सी या जहाजतून प्रवास करत होती. या जहाजातच तिच्यावर हा अत्याचार झाल्याचे तिने सागिंतले आहे. अमेरिकेतील फ्लोरिडामध्ये राहणाऱ्या या पिडीतेने कंपनीविरुद्ध फ्लोरिडा न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र २०१६ मध्ये तिची याचिका फेटाळून लावण्यात आली होती.

माध्यमांनी दिलेल्या अहवालानुसार ही घटना क्रुज इंडस्ट्रिजला धक्का देणारी आहे. मागील काही वर्षात अशा जहाजांवर सेक्स रॅकेटच्या घटना घडल्या आहेत. २०१५ च्या सुट्ट्यांमध्ये जेव्हा ही घटना घडली तेव्हा जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांना याबद्दल माहित होते. पण त्यांनी तिला वाचविण्यासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत तिने म्हंटले आहे की, जहाजावरील व्यवस्थापनाने तिला कोणतीही सुरक्षा दिली नाही. पण जहाज कंपनीने ही घटनेचे गांभीर्य लक्षात घेत असल्याचे सांगितले आहे.

आरोग्यविषयक वृत्त