16 वर्षाच्या मुलीवर दोघांकडून ‘बलात्कार’, मुलगा झाला तर विकण्याचा काढलं ‘फरमान’

नवी दिल्ली :वृत्तसंस्था – बिहारमधील मुजफ्फरपुरमध्ये एका 16 वर्षीय मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. दोन इसमांनी बलात्कार केल्यानंतर हि मुलगी गर्भवती झाली. तिने एका मुलाला जन्म दिल्यानंतर या मुलाला 20 हजार रुपयांमध्ये विकण्याचे फर्मान ग्रामस्थांनी सुनावले.

त्यानंतर आता या प्रकरणी पीडित मुलीची आईची न्यायाची मागणी करत असून पोलिसांमध्ये याची तक्रार दाखल केली आहे. ग्रामस्थांनी या मुलीवर मुलाला विकण्याची जबरदस्ती केली असून जर तिने हे केले नाही तर तिला गावामध्ये राहण्याची परवानगी देण्यात येणार नाही.

यामुळे पीडित मुलीचे कुटुंबीय दहशतीखाली असून बलात्काराची घटना हि 10 महिन्यांपूर्वी घडली आहे.पीडितेचे कुटुंबीय या मुलाला सोबत ठेवण्यासाठी उत्सुक असून ग्रामस्थ मात्र त्यांच्या विरोधात आहेत.दरम्यान, ग्रामस्थ आरोपीला वाचवण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप पीडितेच्या कुटुंबीयांनी केले असून पोलिसांनी मात्र आरोपींवर कारवाई केल्याचे म्हटले आहे.

Visit : Policenama.com 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like