तर… ‘ती’ ठरणार सर्वात कमी वयातील लिंग परिवर्तन शस्त्रक्रिया

बीड : पोलीसनामा ऑनलाईन

बीड येथील पाच वर्षीय अयमान मोहम्मद खान उर्फ अमन , ज्याला एक मुलगी म्हणून वाढवले जात होते. प्रत्यक्षात तो मुलगा आहे असे समजले. ही गोष्ट त्याच्या कार्योटाइपिंग रिपोर्ट मधून समजली. या रिपोर्ट्वरून त्याच्यात X Y गुणसूत्राची जोडी आहे. असे स्पष्ट झाले . आयमान वर शस्त्रक्रिया करण्यासाठी मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालयात तिला आणण्यात आले आहे. जर ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली तर मात्र अशा प्रकारची शस्त्रक्रिया झालेली आयमान सर्वात कमी वयाची ट्रान्स जेंडर व्यक्ती असेल .

याबाबतीत अयमान वडिलांनी सांगितले की , आम्ही आधी तिच्या सर्व गोष्टीचे परीक्षण केले . त्यानंतर गेल्या एक महिन्यापासून सर्जरी करणारे डॉक्टर रजत कपूर यांच्या मार्गदर्शनाखाली तिच्यावर उपचार सुरु केले आहेत. सध्या तिला हार्मोन्स च्या गोळ्या देण्यात येत आहेत . शस्त्रक्रिया करण्याआधी तिला रुग्णालयात भरती केले जाणार आहे आणि नंतर काही चाचण्या करून मग तिच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेची तारीख ठरवली जाणार आहे.

समलैंगिकता गुन्हा नाही : ऐतिहासिक निर्णय

जाहिरात

याबाबतीत सेंट जॉर्ज रुग्णालयाचे अधीक्षक , डॉ मधुकर गायकवाड म्हणाले की, या मुलीच्या कार्योटाइपिंग रिपोर्ट वरून समजले की खरेतर ती एक पुरुष आहे. तिचे गुप्तेंद्रिय अविकसित आहे. त्यामुळे काही महत्वाच्या चाचण्या झाल्यानंतर तिची शस्त्रक्रिया केली जाणार आहे. यावेळी बोलताना आयमान चे वडील म्हणाले ,”मी याबाबतीत खुश तर आहेच मात्र कुठेतरी एक भीती पण वाटते आहे. पण मला रुग्णालयावर पूर्ण भरवसा आहे. हे रुग्णालय आम्हाला आर्थिकदृष्ट्या देखील मदत करीत आहे. मागच्याच महिन्यात आयमान चा पाचवा वाढदिवस साजरा केला. आशा आहे की पुढील वर्षांपासून तिची मुलगा म्हणून ओळख निर्माण होईल .

समलैंगिकतेबद्दल इतर देशांत ‘ही’ परिस्थिती
[amazon_link asins=’B00KGZZ824,B07CD2BN46′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’47671c08-b1d5-11e8-bcc6-2fbce16a1d16′]