धक्‍कादायक ! 17 वर्षीय मुलगी आत्महत्येसाठी चढली टाकीवर, वाचविण्यासाठी लावली जाळी अन् पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एक १७ वर्षांची मुलगी आत्महत्या करण्यासाठी एका टाकीवर चढली. पोलिसांना याची भनक लागली आणि पोलिसांनी तिला आत्महत्या करू नको असे सांगण्याचा प्रयत्न केला इतक्यात त्या मुलीने टाकीवरून उडी मारली. मध्यप्रदेश मधील शिवपुरी येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
Suicide
मंगळवारी दुपारी साक्षी तिवारी नावाची मुलगी आत्महत्या करण्यासाठी टाकीवर चढली होती. साक्षी ही बेनिडिक्ट स्कुलमध्ये १२ ला होती. पोलिसांनी साक्षीचे मन वळवण्याचा खूप प्रयत्न केला मात्र पोलीस टाकीवर चढताहेत हे पाहून मुलीने उडी मारली. पोलिसांनी तात्काळ मुलीला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
Suicide

पोलिसांनी सांगितले की आम्ही मुलीला परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला मात्र परंतु टाकीवर कोणी चढले तर मी उडी मारेल असे म्हणून तिने उडी मारली.
Suicide
तिला वाचवण्यासाठी जाळीची सुद्धा सोय करण्यात आली होती मात्र तरीही तिने उडी मारली आणि तिचा जागीच प्राण गेला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीच्या घरचे देखील अजून या धक्क्यात आहेत की त्यांच्या मुलीने असे का केले. मुलीच्या आत्महत्येचे कारण अजून उलगडलेले नाही.

Visit : policenama.com