एकतर्फी प्रेमातून भरदिवसा तरुणीचा सपासप वार करून खून

अमरावती : पोलीसनामा ऑनलाईन – एकतर्फी प्रेमातून एका महाविद्यालयीन तरुणीवर भरदिवसा एक नव्हे तर तब्बल १७ वार करून खून केल्याची खळबळजनक घटना अमरावतीमध्ये घडली आहे. हा प्रकार आज दुपारी राजापेठ बस स्थानकाजवळील चौकामध्ये घडला. परिसरातील काही तरुणांनी खून करणाऱ्या आरोपीला पकडून राजापेठ पोलिसांच्या स्वाधीन केले.

अर्पिता ठाकरे असे खून झालेल्या महाविद्यालयीन तरुणीचे नाव आहे. तर तुषार मस्करे असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील बातकुली तालुक्यातील कवठा बहाणे या गावातील अर्पिता ठाकरे ही महात्मा फुले महाविद्यालयात शिक्षण घेत होती. आज दुपारी ती गावी जाण्यासाठी राजापेठ बस स्थानकाकडे जात असताना आरोपी तुषार हा तिच्या पाठीमागून आला. त्याने धारदार शस्त्राने तिच्या पोटावर आणि गळ्यावर तब्बल १७ वार केले. तिला गंभीर अवस्थेत रुग्णालयात नेण्यात आले मात्र जास्त रक्तस्त्राव झाल्यामुळे तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. परिसरातील काही तरुणांनी पाहिल्यानंतर त्यांनी तुषारला पकडून बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांनी राजापेठ पोलिसांच्या ताब्यात दिले.

आरोपी तुषार याचे अर्पितावर एकतर्फी प्रेम होते. ती कॉलेजमध्ये जात असताना तुषार तिचा पाठलाग करीत होता. मात्र, अर्पिता याकडे दुर्लक्ष करून त्याला कोणतीच दाद देत नव्हती. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी याच प्रकरणात तुषारवर वडनेरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल देण्यात आली होती. त्यावेळी त्याने पुन्हा अर्पिताला भेटणार नाही असे पोलिसांना सांगितले. तसेच तिची छेड काढणार नसल्याची खात्री पोलिसांना लेखी स्वरुपात दिली होती. मात्र, आज तुषार पुन्हा तिच्या मागे महाविद्यालयात आला होता. त्याने चाकून सपासप वार करून तिचा खून केला. पुढील तपास राजापेठ पोलीस करीत आहेत.

 

आरोग्यविषयक वृत्त

बदामापेक्षा प्रभावशाली फुटाणे, रोज खाल्ल्यास होतील ‘हे’ फायदे

वजन पुन्हा वाढू नये यासाठी करा ‘हे’ साधे उपाय

मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होतात ‘हे’ आजार, अशी घ्या काळजी

सकाळचा ‘नाष्टा’ न केल्यामुळे वाढतो ‘मायग्रेन’चा धोका

टक्कल पडलेय ? करा हा उपाय, अन्य आजारही होतील दूर

चिकूमुळे वाढते रोगप्रतिकारक शक्ती, हाडेसुद्धा होतात मजबूत

 

 

You might also like