‘लफडे’बाज 19 वर्षीय मुलीकडून आईचा खून, मृतदेह घरात असतानाच मित्राबरोबर केलं ‘सेक्स’ !

वृत्तसंस्था – एकापेक्षा जास्त मुलांबरोबर प्रेमसंबंध ठेवण्यास विरोध करणार्‍या आईचा 19 वर्षीय मुलीनं प्रियकराच्या मदतीनं खून केल्याची खळबळजनक घटना हैदराबादमधील हयातनगर येथील व्दारका कॉलनीमध्ये घडली आहे. 38 वर्षीय रंजिता यांचा त्यांच्याच 19 वर्षीय मुलींन खून केला आहे. एवढच नव्हे तर आईचा मृतदेह घरातील एका रूममध्ये लपवून ठेवुन तिनं आणि तिच्या प्रियकरानं दुसर्‍या खोलीत शरीरसंबंध ठेवल्याची माहिती समोर आली आहे.

किर्ती रेड्डी असे त्या लफडेबाज मुलीचं नाव असून ती पदवीच्या दुसर्‍या वर्षात शिकते आहे. तिनं तिचा मित्र बाल रेड्डी आणि शशीच्या मदतीनं आई रंजिता यांचा खून केल्याची कबुली पोलिसांकडे दिली आहे. रंजिता यांचा खून केल्यानंतर आई बेपत्ता होण्यासाठी वडिलच जबाबदार असल्याचं ढोंग तिनं केलं होतं. वडिलांकडून आईचा छळ होत होता आणि त्यांनीच तिचं काहीतरी बरं वाईट केलं असा आरोप देखील तिनं हे प्रकरण समोर येण्यापुर्वी केला होता. दरम्यान, प्रकरणाचा तपास करताना ही खळबळजनक घटना समोर आली असून किर्ती रेड्डीनं गुन्हा कबुल केला. त्यानंतर मात्र प्रकरणाचा तपास करणार्‍या पोलिसांची चांगलीच भंबेरी उडाली आहे.

मयत रंजिता यांचे पती श्रीनिवास रेड्डी हे ट्रक चालक आहेत. दि. 24 ऑक्टोबर रोजी श्रीनिवास घरी पोहचले त्यावेळी त्यांना घराला कुलूप दिसलं. त्यांनी पत्नी रंजिताला मोबाईलवर कॉल केला मात्र तो नॉट रिचेबल लागला. त्यानंतर त्यांनी मुलगी किर्ती हिला फोन केला. अभ्यास दौर्‍यासाठी आपण विशाखापट्टणम येथे आलो असल्याचं किर्तीनं वडिलांना सांगितलं. त्यानंतर गुरूवारी श्रीनिवास यांनी पत्नी रंजिता ही हरविली असल्याचं किर्तीला सांगितलं तसेच तात्काळ हैदराबादला येण्याचा आदेश दिला. मात्र, किर्ती शनिवारी हैदराबादला परतली आणि तिनं पोलिसांकडे आई हरविल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांकडे तक्रार देताना किर्तीनं वडिलांवर गंभीर आरोप करत वडिलच आईला त्रास देत होते असं सांगितलं.

पोलिसांनी प्रकरणाचा तपास चालु करतच किर्तीला उलट-सुलट प्रश्न विचारण्यास सुरवात केली. तपासादरम्यानच किर्तीनं आई रंजिताचा प्रियकर आणि मित्राच्या मदतीनं खून केल्याचं कबुल केले. किर्तीनं पोलिसांना सांगितल्याप्रमाणे रंजिता आणि तिचं दि. 19 ऑक्टोबरला खुप भांडण झालं. शेजारी राहणारा मित्र शशीला तिनं तिची बाजू मांडायला सांगत भांडण वाढवलं. त्याच रात्री किर्ती आणि शशीनं रंजिता या झोपेत असताना त्यांचा साडीनं गळा आवळुन खून केला. दि. 22 ऑक्टोबरपर्यंत किर्ती आणि शशी मृतदेहाबरोबर एकाच खोलीत राहिले. दरम्यान, किर्ती आणि शशीनं दुसर्‍या खोलीत शरीरसंबंध ठेवले.

मृतदेह घरातच असल्यानं दुर्गंधी येऊ लागली. त्यानंतर त्या दोघांनी मृतदेह गाडीमधून मृतदेह तुम्मलगुडा येथील रेल्वे स्थानकावर नेऊन रूळांवर टाकला आणि रंजिता यांचा मृतदेह अपघाती मृत्यू दाखविण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी हयातनगर पोलिसांनी आरोपी किर्तीला अटक कली आहे.