रॅली दरम्यान ‘सनी’ला केले एका महिलेने ‘Kiss’

गुरदासपुर : वृत्त संस्था – सध्या देशात निवडणूकचे वातावरण आहे. पक्ष-अपक्ष पार्टिचे लोक आपला-आपला प्रचार करण्यात खुप व्यस्त आहे. पंजाबमधील गुरुदासपुर बटाला येथे भाजपचे उमेद्व्रार अभिनेता सनी देओल याची येथे रॅली काढण्यात आली. या रॅलीला लोकांनी प्रचंड गर्दी केली होती.
जिथे-तिथे भाजपच्या नावाचा नारा चालू होता. सगळे लोक अभिनेता सनी देओल याची एक झलक पाहण्यासाठी खुप उत्सुक होते. सनी देओलला पाहण्यासाठी लोकांनी खुप गर्दी केली होती. यावेळी असे घडले ज्याचा कोणी विचार करु शकत नाही. अभिनेता सनी देओलच्या गाडीवर एक महिला चढली.
त्या महिलेला पाहून अभिनेता सनी देओलला वाटले की, ती महिला त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी आली आहे. मात्र, नंतर असे घडले की सनी देओल थक्क झाले. ती महिला अचानक सनी देओलच्या गळ्यात पडली व त्यानंतर तिने त्यांच्या गालावर किस केले. सनी देओलला किस केल्यानंतर ती महिला गाडीच्या खाली उतरली. हा प्रसंग पाहून तेथिल सर्व लोक हसायला लागले.
भाजपाचे उमेद्वार सनी देओलची गुरुदासपुर लोकसभा मतदारसंघासाठी बटालामध्ये रॅली काढण्यात आली. ही रॅली सुरु होण्याआधी सनी देओल बटाला बार कौंसिल मध्ये वकीलांना भेटण्यास गेले.