‘या’ मुलीनं दोन्ही पाय तुटलेले असताना देखील ‘रॅम्प वॉक’ करून रचला ‘इतिहास’ !

इंग्लंड : वृत्तसंस्था – इंग्लंड मधील बर्मिंघम मध्ये राहणाऱ्या ९ वर्षाच्या मुलीला एका आजारामुळे आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. त्याच मुलीने आज न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये ‘रॅम्प वॉक’ करून ‘इतिहास’ रचला आहे. दोन्ही पाय गमावलेले असताना ‘न्यूयॉर्क फॅशन वीक’ मध्ये सामील होणारी डेजी डिमेट्री पहिली मुलगी बनली आहे. ती लहान असताना तिचे दोन्ही पाय तोडावे लागले होते.
New-York-Fashoin-Week
न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये भाग घेणे गर्वाची बाब
केवळ ९ वर्षाची डेजी डिमेट्री या महिन्यात होऊ घातलेल्या ‘पॅरिस फॅशन वीक’ मध्ये भाग घेणार आहे. डेजी ने सांगितले की, न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये सामील होऊन तिला गर्व वाटला.

रविवारी डेजी ने न्यूयॉर्क फॅशन वीक मध्ये ‘लुलु’ या ब्रँड साठी रॅम्प वॉक केला आहे. ही मुलगी जन्मापासूनच ‘फिबुलर हेमिमेलिया’ नावाच्या आजाराने ग्रस्त होती. या आजारामुळे हाडांचा विकास होणे थांबते. केवळ १८ महिने वय असताना डॉक्टरांना तिचे दोन्ही पाय कापावे लगले होते.
NEW-York
कृत्रिम पायांच्या मदतीने ८ वर्षांपासून मॉडेलिंग
न्यूयॉर्क फॅशन वीक मधील रॅम्प वॉक वर तिची ११ वर्षाची बहीण एला ने सुद्धा तिला साथ दिली. कृत्रिम पायांच्या साहाय्याने डेजी ८ वर्षाची असल्यापासून मॉडेलिंग करत आहे. तिने Nike आणि बोडेन सारख्या सुप्रसिद्ध ब्रँड साठी कँपेन केलं आहे. जव्हा डेजी आईच्या गर्भात होती तेव्हाच तिच्या आई-वडिलांना हे माहित झाले होते की, ती एका गंभीर आजाराने ग्रस्त आहे. डेजीच्या एका पायात हाड नव्हते. दुसऱ्या पायात सुद्धा हाडाचा साधारण विकास झाला होता. ८ तासाच्या सर्जरी नंतर तिचे दोन्ही पाय कापावे लागले होते.