धक्कादायक ! आपल्या प्रियकराला मॉलमध्ये कुत्र्यासारखं फिरवताना दिसली महिला, फोटो व्हायरल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आपण नेहमीच म्हणतो आणि ऐकतो की, प्रेम आंधळं असतं. प्रियकर आणि प्रेयसी आपल्या प्रेमासाठी काहीही करायला तयार असतात. पण सध्या सोशल मीडियावर व्हयरल होत असलेल्या फोटोमुळे तुम्हा प्रश्न पडेल की हे काय ? व्हायरल झालेल्या फोटोतील महिलेने तर सर्व सीमा पार करत आपल्या प्रियकराला (boyfriend) कुत्रा (dog) बनवलं आहे. त्याच्या गळ्यात पट्टा (dogs leash) बांधून त्याला शहरभर फिरवत सुटली आहे. दोघांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. आपल्या बॉयफ्रेन्डला अशा अवस्थेत सोबत घेऊन ती मॉल (mall) आणि रस्त्यांवर (road) सिगारेटचे झुरके मारत फिरताना दिसली. लोकांनी या फोटोवर प्रतिक्रिया देत महिलेवर टीका केली आहे.

BDSM हे ऐकताच अनेकांना ‘फिप्टी शेड्स ऑफ ग्रे’ सिनेमाची आठवण येते. या सिनेमात एकमेकांवर प्रेम करणारे दोन लोकच एकमेकांना वेदना देतात. असंच काहीसं केलं या महिलेने. लाल केस, एका हातात सिगारेट आणि दुसऱ्या हातात कुत्र्याची चेन असलेली मुलगी दुसऱ्या कुणाला नाही तर आपल्या प्रियकराला अशा प्रकारे फिरवत आहे. या जीवनशैलीला बीडीएसएम या नावाने ओळखलं जातं.

या प्रकारच्या लाइफस्टाईलमध्ये एक डॉमिनन्ट असतो आणि दुसरा सबमिसिव्ह असतो म्हणजे आधीन असतो. या महिलेने तिच्या प्रियकराची अशी स्थिती करुन टाकली की, त्याला कुत्रा बनवून सोडलं. कधी अशाप्रकारे त्याला मॉलमध्ये घेऊन फिरते तर कधी रस्त्यावर. या दोघांचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत. अनेकांनी यावर टीका केली आहे. तर काहींनी ट्रोल करत आहेत. एका यूजरने यावर कमेंट करताना म्हटले की, अशावेळी मास्क वापरणं गरजेचं आहे. पण प्रियकराला अशाप्रकारे कुत्र्यासारखं ट्रीट करणं चुकीचं आहे.

You might also like