पुरी येथील जगन्नाथ मंदिरात तिनं केला TikTok व्हिडिओ, आली ‘गोत्यात’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – थेट जगन्नाथ मंदिरातच टिक – टॉक व्हिडिओ शूट केल्याने पोलिसांनी एका तरुणीला अटक केली आहे. पुरीच्या जगप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात टिक टॉक व्हिडिओ काढून सोशल मिडियावर शेअर केला आणि पोलिसात खळबळ उडाली. याला कारण की, जगन्नाथ मंदिरात सुरक्षेच्या कारणास्तव कॅमेऱ्याने फोटो, व्हिडिओ काढण्यास सक्त मनाई आहे. असे असताना याच मंदिरातील व्हिडिओ व्हायरल झाल्याने मंदिर प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केली. सिंहद्वार पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल करुन प्रकरणीचा तपास केला.

लड़की ने जगन्नाथ मंदिर के अंदर बनाया Tik-Tok, पहुंच गई जेल

पोलीस तपासात स्पष्ट झाले की सोशल मिडिया अकाऊंटवर ही व्हिडिओ एका अल्पवयीन मुलीने तयार केला आहे आणि टिक टॉकला पोस्ट केले आहे. यानंतर या मुलीला पोलीस ठाण्यात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. आपल्या कुटूंबाबरोबर ही मुलगी पोलीस स्थानकात दाखल झाल्यानंतर चौकशीअंती तिला ताब्यात घेण्यात आले.

लड़की ने जगन्नाथ मंदिर के अंदर बनाया Tik-Tok, पहुंच गई जेल

मुलीला कलम 295 (अ) प्राचीन स्मारक अधिनियम 30 आणि आयटी अधिनियम 66 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पुरीच्या एसपी उमा शंकर दास यांनी सांगितले की नोटीस 41 (अ) देण्यात आली आहे. त्यानंतर चौकशी करुन आणि समज देऊन मुलीला सोडण्यात आले आहे.

Visit : Policenama.com