धक्कादायक ! अपहरण करुन चिमुकलीचा खून

पिंपरी : पोलिसनामा ऑनलाइन – पिंपरी चिंचवड मधील पिंपळे सौदागर येथे कामगार वसाहती मध्ये राहणाऱ्या अडीच वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन खून केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. सोमवारी संध्याकाळी मुलगी बेपत्ता झाली होती तर मंगळवारी सकाळी मृतदेह आढळला आहे. यामध्ये काही घातपात, अत्याचार आहेत का हे शवविच्छेदन अहवालात समोर येणार आहे.

प्राथमिक माहिती अशी की, सांगवी पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिंपळे सौदागर येथे एका इमरतीचे बांधकाम सुरु आहे. त्या ठिकाणी पीडित चिमुकली आई वडिलांसोबत राहत होती. सोमवारी सायंकाळी तीचे अपहरण करण्यात आले. पालक आणि नातेवाईकांनी सगळीकडे शोधा शोध केली मात्र ती आढळून आली नाही. मंगळवारी सकाळी तिचा मृतदेह पिंपळे सौदागर येथील मिलेटरी एरिया मध्ये आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी औंध रुग्णालयात पाठवला आहे. मात्र मुलीचे अपहरण करुन खून केला असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून आणखी काही अत्याचार केले आहेत का ते अहवालानंतर स्पष्ट होईल असे सांगितले. तपास सांगवी पोलिस आणि गुन्हे शाखा पथक करत आहेत.

आरोग्यविषयक वृत्त –