दुसऱ्या जातीच्या मुलाशी केला प्रेम विवाह, भावांनी हत्या करून ‘गायब’ केला मृतदेह

पोलीसनामा ऑनलाईन : आंतरजातीय प्रेम विवाह करणे मुलीच्या आयुष्यावर भारी पडले. लव्ह मॅरेज नंतर भावांनी तिला विश्वासाने कॉल करून बोलावले आणि नंतर तिची हत्या करून मृतदेह गायब केेला. ही खळबळजनक घटना उत्तर प्रदेशमधील मैनपुरी जिल्ह्यातील आहे. मैनपुरी येथील एका मुलीला आंतरजातीय लव्ह मॅरेज करण्यासाठी जीवाची किंमत मोजावी लागली.

मुलीच्या भावाने तिला विश्वासाने दिल्लीहून मैनपुरी गावी बोलावले आणि दोन भावांच्या मदतीने तिची हत्या मृतदेह गायब केला. विवाहित युवकाच्या तक्रारीवरून अहवाल नोंदविल्यानंतर, दिल्ली पोलिसांनी मुलीच्या भावाला पकडले. मृृतदेहाच्या शोधात दिल्ली पोलिस मैनपुरी येथे पोहचले आणि स्थानिक पोलिसांच्या मदतीने मृतदेहाच्या शोधात जेसीबीकडून शेतात उत्खनन केले. दरम्यान, अद्याप मृतदेह सापडला नाही.