वडिलांच्या मित्रानेच केला आठ वर्षाच्या बालिकेवर अत्याचार

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन

पिंपरी येथे राहणाऱ्या आठ वर्षाच्या बालिकेवर वडिलांच्या मित्रानेच लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. गोविंद भगवान अडसूळ (३०, रा. मिलिंदनगर, पत्राशेड, पिंपरी) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात कोणी नसल्याचा फायदा घेत दुपारी एकच्या सुमारास अडसूळ मित्राच्या घरी गेला. त्यावेळी त्याची आठ वर्षीय मुलगी घरात एकटीच होती. घरात इतर कोणी नसल्याचे पाहून त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. पालक घरी आल्यावर पीडित मुलीने याबाबत सांगितले. या प्रकरणाचा तपास पिंपरी पोलिस करीत आहेत.आरोपीला कठीण शिक्षा करण्यात यावी अशी मागणी मुलीच्या पालकांकडू होत आहे.