सावत्र बापाकडून मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – सावत्र बापानेच एका अल्पवयीन मुलीवर राहत्या घरात बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी 16 वर्षीय मुलीने कोंढवा पोलीस ठाण्यात पिर्याद दिली आहे. त्यानुसार, 35 वर्षीय नराधम बापाला पोलिसांनी अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी शिक्षण घेते. तिची आईने दुसरे लग्न केले आहे. आई बाहेर गेल्यानंतर पिडीत मुलगी घरी अभ्यास करत बसली होती. त्यावेळी आरोपी घरी आला. त्याने मुलीच्या हातातील पुस्तक तोंड दाबून जबरदस्ती केली. तिला व तिच्या आईला जीवे ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. पिडीत मुलीने पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर आरोपी नराधमावर गुन्हा दाखलकरून अटक करण्यात आली आहे. अधिक तपास कोंढवा पोलीस करत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा https://www.facebook.com/policenama/