पुण्यातील दिघीत अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – पाळलेल्या मांजराला आणण्यासाठी गेलेल्या १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बोक्यानेच झडप घालून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. दिघी येथील भारतमाता नगर येथे हा प्रकार घडला असून आरोपी तरुणाने त्याचा व्हिडिओ बनवून तो व्हिडिओ नेटवर टाकण्याची धमकी देऊन तिच्यावर पुन्हा अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे.

दिघी पोलिसांनी साहिल बुरसे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ही घटना डिसेंबर व जानेवारी मध्ये घडली. याबाबत पोलिसांनी सांगितले की, या मुलीने एका मांजर पाळले आहे. हे मांजर इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर गेले होते. तिला आणण्यासाठी ही मुलगी तेथे गेली व मांजराला आवाज देऊ लागली.

तिचा आवाज ऐकून साहिल बुरसे नावाचा बोकाच रुममधून बाहेर आला व त्याने तिचे तोंड दाबून बाथरुममध्ये ओढून नेले. तिच्यावर बलात्कार केला. त्याचा स्वत:च्या मोबाईलवर व्हिडिओ काढला. तो तिला दाखवून हा प्रकार कोणाला सांगितला तर हा व्हिडिओ नेटवर टाकून तुझी बदनामी करेल, अशी धमकी दिली. त्यानंतर त्याने जानेवारी २०१९ मध्येही अशाच प्रकारे तिच्यावर दुसऱ्यांदा बलात्कार केला. यामुळे तिला त्रास झाल्याने आता तिच्या फिर्यादीवरुन दिघी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

व्यायाम केल्यास ‘मधुमेहात’ होऊ शकते सुधारणा
‘स्मरणशक्ती’ वाढविण्यासाठी हे रामबाण उपाय आवश्य करा
‘या’ व्यसनांमुळे बिघडते तुमचे ‘आरोग्य’, या व्यसनांपासून कायम राहा दूर
अहो आश्चर्यम ! ‘वजन’ कमी करण्यासाठी रात्री फक्त ‘हे’ करा