धक्‍कादायक ! मध्यरात्री मित्राच्या रूममध्ये गेलेल्या युवतीवर १२ जणांकडून सामुहिक बलात्कार, बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ

आर्यलँड : वृत्तसंस्था – आर्यलँड येथील साईप्रस येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १९ वर्षीय मुलीवर ११ मुलांनी एकत्रित बलात्कार केला आहे. या मुलीच्या सांगण्यांनुसार ही मुलगी रात्री उशीरा एका मुलाच्या रुममध्ये गेली. त्यानंतर तेथे त्या मुलाचे ११ मित्र आले आणि तिचा बलात्कार केला आहे. या अरोपांतर्गत एकूण १२ मुलांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी ही ब्रिटश असून आरोपी मुलं ही इस्त्राइलचे आहेत.

ही मुलगी बजट रिसॉर्ट मध्ये थांबली होती. तेव्हा रात्री उशिरा ती एका मुलाच्या रुममध्ये गेली. हा मुलगा इस्त्राइलचा होता. तोही आपल्या मित्रांसोबत त्या हॉटेलमध्ये थांबला होता.  तेथे तिने हेही सांगितले की ती आधीच एका मुलासोबत असताना त्या मुलाचे ११ मित्र अचानक तेथे आले. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. ती बेशुद्ध होण्यापर्यंत तिच्यावर त्यांनी अत्याचार केले. त्यानंतर त्यांनी तिला सोडले. या मुलीच्या शरिरावर अनेक ठिकाणी जखमा आल्या आहेत.

मुलीनी सांगितल्यानुसार पोलीसांनी इस्त्राईलच्या मुलांना अटक केली आहे. पोलीसांनी हेही सांगितले की, या मुलीने त्यातील एका मुलाशी आधीच संबंध बनवले होते. पोलीस या मुलांना न्यायालयात हजर केले असून पोलीस आता डीएनएचा रिपोर्ट काढत आहे. तसंच यावर अधिक तपास करत असल्याचेही त्यांनी सांगितले. मुलगी दुसऱ्या हॉटेलमध्ये शिफ्ट झाली आहे. तिला कांउसिलिंगची सुविधा उपलब्ध करून दिली आहे, असंही पोलीसांनी सांगितलं.

दरम्यान, आम्ही पीडित मुलीला सर्व सुविधा उपलब्ध करून देत आहोत. तसंच ती मुलगी आपल्या घरी जाऊ शकते. मात्र केस संपेपर्यंत ती मुलगी येथे थांबावी अशी इच्छा आहे. तसंच त्याच हॉटेल मधील इतर मुलींनीही या मुलांविरोधात तक्रार केली. ही मुले या पूर्वीही हॉटेलमध्ये घुसुन एका मुलीला सेक्सची मागणी केली होती, असं तेथील इतर मुलींनी सांगितलं आहे.

आरोग्यविषयक वृत्त

Loading...
You might also like