क्रुरतेचा कळस ! युवतीवर ‘बलात्कार’ करून विकले

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – फिरण्याच्या बहाण्याने तरुणीला नेऊन तिला गुंगीचे औषध पाजून मुंबईत आणून तिच्यावर बलात्कार करून 12 हजार रुपयांना विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने दलाल महिलेच्या मोबाईलवरून लपून आईला फोन करून तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर स्वयंसेवींच्या मदतीने तिची सुटका करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पीडित तरुणी पश्चिम बंगालची असून तिच्यावर बलात्कार करून तिला कुंटणखान्यात विकले होते.

पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीनुसार, मार्च 2017 मध्ये पश्चिम बंगाल येथील तिच्या गावी ती आजारी होती. त्यावेळी ती नेहमी परिसरातील एका औषधाच्या दुकानात औषध आणण्यासाठी जात होती. त्यावेळी तिची ओळख दुकानात काम करणाऱ्या पंकज मंडल नावाच्या व्यक्तीशी झाली. त्यानंतर त्याचे तिच्या घरी येणे-जाणे सुरु झाले. 16 ऑगस्ट 2019 रोजी पंकजने तिला हावडा ब्रिज येथे फिरण्यासाठी घेऊन गेला. त्याठिकाणी तिला गुंगीचे औषध दिले. तरुणीला शुद्ध आली असता तेव्हा ती मुंबईला जाणाऱ्या रेल्वेमध्ये होती. आपण चुकीच्या गाडीत बसलो असून मुंबईत पोचून परत गावी जाऊ असा विश्वास पंकजने तिला दिला.

पंकजने तिला मानखुर्द येथील एका खोलीमध्ये घेऊन गेला. त्याठिकाणी तिच्यावर दोन दिवस बलात्कार केला. त्यानंतर पंकजच्या मित्रांनी देखील तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने पीडित तरुणीला राजू उर्फ अजीज शेख (वय-45) याच्या स्वाधीन केले. पंकजने तिला 12 हजार रुपयांना शेखला विकल्याचे तरुणीने सांगितले. शेखने तिला कामाठीपुऱ्यातील एका कुंटणखाना चालवणाऱ्या जंपन रेणुका हिच्या स्वाधीन केले. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

Visit : policenama.com